(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Harshvardhan Patil: शरद पवारांच्या निर्णयावर आक्षेप? इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशानंतर झळकला आणखी एक बॅनर, पाटलांसमोर आव्हाने?
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपला रामराम करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर इंदापुरात पुन्हा बॅनर झळकू लागले आहेत.
इंदापूर: इंदापुरातील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी आज भाजपला रामराम करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर इंदापुरात पुन्हा बॅनर झळकू लागले आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या भूमिकवर आक्षेप घेतल्याचा बॅनर लावून आज पवार साहेबांनी इंदापूर तालुक्यात जो निर्णय घेतला. तो म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची झालेले आहे असा आशय त्या बॅनरवर लिहण्यात आला आहे. इंदापुरातील दोघांनाही जनता कंटाळले होती. माझा राजा असा नव्हता अशा प्रकारचे सोशल मीडियावर बॅनर व्हायरल करून राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यांकडून हर्षवर्धन पाटलांसमोर आव्हाने निर्माण केले असल्याचेच दिसून येत आहे.
हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा विरोध
इंदापुरातील शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. आयात उमेदवाराला संधी देऊ नका, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हाती तुतारी घेणार असल्याची इंदापुरात जोरदार चर्चा सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे हे कार्यकर्त्यांसह शरद पवारांची भेट घेतली होती.
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर दशरथ माने यांनी तुम्ही द्याल तो उमेदवार निवडून येईल, आपण चुकीचा निर्णय घेऊ नका अशी विनंती यावेळी केली. तर आप्पासाहेब जगदाळे यांनी सहा जण उमेदवार आहेत कुणालाही उमेदवारी द्या, ज्यांनी ज्यांनी ताईंना विरोध केला आहे त्यांना आम्ही घरी बसवू असा विश्वाय यावेळी व्यक्त केला होता.
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार
आज हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कोणता निर्णय घ्यायचा याबाबत प्रश्न केले, त्यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना तुतारी फुंकण्यासाठी समर्थन दिलं. यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी हा निर्णय घेण्याआधी आपण भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली आहे.
महाविकास आघाडीत इंदापूरची जागा शरद पवार गटाला
इंदापूरची जागा महाविकास आघाडीत शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपकडून संधी न मिळाल्यास हर्षवर्धन पाटील यांच्याकडे तुतारी हाती घेण्याचा पर्याय होता. त्यांच्या कार्यकर्त्यांचा देखील तसा आग्रह होता. पण शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना आयात उमेदवार नको आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती.