(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Gandhi Kolhapur Visit : राहुल गांधी दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर
Rahul Gandhi Kolhapur Visit : राहुल गांधी दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर
काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आज (ता.4) कोल्हापूरचा नियोजित दौरा रद्द झाला आहे. राहुल गांधी आजपासून कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येणार होते. या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र, राहुल गांधी यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आजचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आजचा पुतळा लोकार्पण सोहळा उद्या सकाळी दहा वाजता होणार आहे. उद्या शनिवारी राहुल गांधी यांचे सकाळी साडेआठ वाजता कोल्हापूरमध्ये आगमन होणार आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजता पुतळ्याचं लोकार्पण पार पडणार आहे.
कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण आणि संविधान सन्मान संमेलनाचे आयोजन काँग्रेसचे परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी केले आहे. देश आणि राज्यातून आलेल्या प्रतिनिधींसमोर पुन्हा एकदा संविधान सन्मान संमेलनात पुन्हा एकदा संविधानाचा मुद्दा मांडण्यावर गांधी यांचा भर असणार आहे.