Girish Mahajan vs Sanjay Raut : महाजन-राऊत वादाचा नवा अंक,टीका जिव्हारी, प्रतिटीका करारी
महाराष्ट्राच्या राजकारणात जुन्याच वादाचा नवा सीझन सुरू झालाय. गिरीश महाजन आणि खासदार संजय राऊत यांच्यातल्या वादाचा दुसरा अंक आज पाहायला मिळला. दैनिक सामनाच्या अग्रलेखातूनही गिरीश महाजनांवर हल्लाबोल करण्यात आलाय. विशेष म्हणजे या अग्रलेखात महाजन यांचा नाच्या असा उल्लेख करण्यात आलाय.
सामनाच्या अग्रलेखातून गिरीश महाजन यांच्यावर नेमकी काय टीका करण्यात आलीय पाहूया...
शिवजंयती असली की आपण लेझीम खेळतो, भगवा झेंडा घेऊन नाचतो, त्यात वावगं काय? अशा शब्दात गिरीश महाजन यांनी सामनातील टीकेवर उत्तर दिलंय
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजनांना पुन्हा एकदा डिवचलंय...गिरीश महाजन फडणवीस सरकारमधले सर्वात भ्रष्ट मंत्री असल्याचा घणाघात राऊतांनी केलाय...अभिषेक कौल नावाची व्यक्ती महाजनांच्या कार्यालयात बसतात, त्यांच्या फोननंतरच महाजन फाईल्सवर सही करतात, असा आरोप राऊतांनी केलाय...तर महाजनांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी केंद्रीय समितीचा विरोध होता, असा दावाही राऊतांनी केलाय...तर आपल्या खात्यातील २०९ फाईल्सपैकी १९३ फाईल्स क्लिअर असल्याचं स्पष्टीकरण गिरीश महाजनांनी दिलंय...















