Eknath Shinde Vs Jayant Patil : सभागृहात फक्त घोषणा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सत्ताधारी वि. विरोधक
Eknath Shinde Vs Jayant Patil : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सत्ताधारी वि. विरोधक , सभागृहात फक्त घोषणा, विरोधकांचा हल्लाबोल
राज्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात अतिवृष्टी झाली होती. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने काढून घेतला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून सरकारने हजारो कोटींची मदत केल्याचं विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. भरपाईचा आकडा सांगितला त्यासोबतच सर्व हिशोब दिला आहे..गेल्या दीड वर्षात म्हणजे सत्तेत आल्यापासून विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला 44 हजार 278 कोटींची विक्रमी मदत केली असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.. दरम्यान शेतकऱ्यांना मदत पोहचत नसल्याची टीका विरोधकांनी केलीय..