एक्स्प्लोर

Raj Thackeray Full Speech Prabhadevi:लेकासाठी बापाचं पहिलं भाषण;राज ठाकरेंनी धू धू धुतलं : ABP Majha

Raj Thackeray Full Speech Prabhadevi:लेकासाठी बापाचं पहिलं भाषण;राज ठाकरेंनी धू धू धुतलं : ABP Majha
बोरवेलला मला सभा घ्यायचीच होती यादीमध्ये नसलं तरी मी ती घेतली  अत्यंत सभ्य उमेदवार तुम्हाला मी दिलाय  चांगला अभ्यासू असा हा उमेदवार आहे  काही जणांच्या जाहीरनामे जाहीर झाले  वीस वर्षापूर्वी सांगितल्या होत्या त्या आज पण होत्या जाहीरनाम्यामध्ये  काँग्रेसच तर बोलूच नका बाहेरून नुसती बदाबदा  माणसं  पाडतात मुळ कर दाते यांना त्रास होत आहे संजय गांधी नॅशनल पार्क जगात  एकमेव अस नॅशनल पार्क आहे की शहरांमध्ये एवढा मोठा आहे आमची शहर बॉम्ब टाकल्यासारखी का वाटतात राजकारणांना कॅरेक्टर उरला नाही शहरांना कुठून येणार माझा पुनर्जन्मामध्ये विश्वास नाही त्यामुळे पाच वर्ष खूप महत्त्वाचे असतात    राज ठाकरे  -   माझ्याकडे वेळ कमी आहे त्यातून मुंबईचा ट्राफिक आणि त्याचा झालेला विचका... त्यातून मार्ग काढत काढत मी इथपर्यंत पोहोचलो...   दिवसाला तीन तीन चार चार सभा चालू आहेत...   मी आलो आहे ते तुमच्या सर्वांचं दर्शन घेण्यासाठी... आणि सहज चार गोष्टी सांगण्यासाठी...   मला बोरवली ला सभा घ्यायचीच होती ते यादीमध्ये नव्हतं पण घ्यायचीच होते...   अत्यंत सभ्य उमेदवार दिलेला आहे...   त्याच्या जाणिवा जागा असलेला उमेदवार अभ्यास उमेदवार आहे...   आज बऱ्याच जणांचे जाहीरनामे जाहीर झालेले आहेत...   वीस वर्षांपूर्वी सांगितलेल्या गोष्टी आज सुद्धा त्यात जाहीरनाम्यात होत्या...   काँग्रेसचा तर बोलूच नका .    एका बाजूला प्रगती झाली असं म्हणायचं पण दुसरीकडे जुना बोरिवली चांगलं होतं असं सुद्धा वाटत आहे    याचं कारण म्हणजे कसलीही यंत्रणा लावलेले नाही    बाहेरून बदाबदा माणसं येत आहेत...   एखादा शहर म्हटलं तर ठीक आहे माणसं येणं स्वाभाविक आहे...   पण जे मूळ करता ते आहेत त्यांना त्रास व्हायला लागला...   फुटपाथ वर चालता येईना रस्त्यावर गाड्या चालवता येईना... मैदानावर बागा उरल्या नाहीत...   मग कोणती डेव्हलपमेंट झाली??   प्रत्येक नागरिकाला घरातून बाहेर पडल्यावर बरं वाटलं पाहिजे की मी या शहरात राहतो आहे...   या बोरवली मध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आहे...   फक्त भारतात नव्हे तर जगात इतकं मोठं नॅशनल पार्क असलेलं शहर म्हणजे फक्त मुंबई आहे...   आपण बोलतो घरात बिबट्या आला...   पण तुम्ही बिबट्याच्या घरात गेलात...   आपलं संजय गांधी नॅशनल पार्क पवई ला सुरू होतं आणि गौडबंदरला संपत इतकं मोठं पार्क आहे...   अशाप्रकारे पार्क इतर पाठ्य देशांकडे असतो तर त्यांनी इतकंच जपलं असतं आपण त्याची कल्पना सुद्धा नाही करू शकत...   आपले शहर बॉम्ब टाकल्यासारखी का वाटतात?   काहीही चालतय फुटपाथ तुटलं रस्ते नाहीत खड्डे आहेत...   याचं कारण म्हणजे आपला नक्की काय पाहिजे याची कल्पना तुम्हाला सुद्धा नाही आणि राजकारण्यांना सुद्धा नाही...   छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले पाहिले तर तुम्हाला आर्किटेक्चर नावाची गोष्ट कळेल...   शहरांना एक कॅरेक्टर लागतं...   राजकारणांनाच कॅरेक्टर उरलं नाही तर शहरांना कुठून येणार??   त्यांच्याकडे आपलं लक्ष नाही कारण आपण त्यांना प्रश्न विचारत नाही...   आतापर्यंत कोण कोण आमदार नगरसेवक खासदार होऊन गेले त्यांना एकदा प्रश्न विचारा ..   निवडणूक आल्याचे हात जोडतात पाया पडतात आणि निवडणुका झाल्या की पाच वर्ष तुमच्याकडे बघत सुद्धा नाहीत...   तुम्ही प्रश्न विचाराल अशी त्यांना भीती वाटली पाहिजे पण त्यांना भीतीच उरली नाही...   चांगल्या जातीचा चांगल्या पक्षाचा असा आपण मतदान करतो पण हा चांगलं काम करतो की नाही यावर आपण मतदान करीत करीत नाही...   पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा कैलासवासी बाळासाहेब ठाकरे असतील यांच्या नावावर तुमच्याकडे मत मागायला येतात...   पण तुम्हाला प्रश्न पडत नाही की बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर मतदान केलं पण आता बाळासाहेब ठाकरे नाहीत...   नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून मतदान केलं पण आपल्या बोरिवली मधील प्रश्न नरेंद्र मोदींना कसे सांगायचे??   पाच वर्ष कशाला म्हणतात कळतं का??   नुसता शिक्षित मतदार नाही चालत तर सुज्ञ मतदार पाहिजे...   तुम्हाला उत्तम शहरा मिळू शकतात फक्त तुम्हाला उत्तम आमदार निवडता आला पाहिजे...   मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो...   सरकारची काम आम्ही सरकारच्या बाहेर राहून केली...   स्वतंत्र मिळाल्यावर पहिल्यांदा भाषावार प्रांतरचना केली केली...   मग आज महाराष्ट्रात मराठी लोक राहतात तर दुकानावरील पाट्या मराठी नकोत का??   सुप्रीम कोर्टाने एकाच वेळेला दोन शहरांची मूळ नाव ही त्यांना देण्यात आली... एक मुंबई आणि दुसरं मद्रास जे आता चेन्नई आहे...   चेन्नई हे नाव कसं काय तुमच्या तोंडात पटकन बसले?? मग मुंबई बोलायला लाज वाटते का??   मुंबादेवी आणि देवीला लोक आई म्हणतात त्यावरून मुंबई हे नाव पडलं...   नंतर ब्रिटिश आले आणि ते बॉम्बे बोलले म्हणून तुम्ही बॉम्बे करत आहात का??   मग उत्तरेतील लोक आहे त्यांनी बॉम्बेचे मुंबई केलेत मग तुम्ही मुंबई बोलतात का??   जिभेला कितीही त्रास झाला तरी त्रिवेंद्रमला तिरुअनंतपुरम बोलतो की नाही??   कारण त्यांचा ते मूळ नाव आहे त्यांच्या अस्मिता आहे...   जसा महाराष्ट्रात मराठीचा मान राखला गेला पाहिजे तसा इतर राज्यात त्या त्या भाषेचा मान राखला पाहिजे...   पण हा सगळा मान राखता राखता तुमच्यातील हिंदू सुद्धा विसरता कामा नये...   आपल्यातील हिंदू फक्त दंगलीत जागा होतो...   हेच राजकारणी तुम्हाला हेरतात आणि तुम्हाला जातीजातीमध्ये वेगळं करतात...   तुम्हाला तुमच्यातच खेळवत बसतात...   आणि मग शहरांची विल्हेवाट लावत बसतात...   मागील पाच वर्षात महाराष्ट्रात झालेला सावळा गोंधळ तुम्ही पाहिला असेल...   लोकांनी मतदान केल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी घोळ घालून ठेवायचा...   निकाल लागल्यानंतर सतरा हजार कोटी रुपये घोटाळा केल्या म्हणून त्यांना अटक करणार होते त्यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केला...   मग ते अर्ध्या तासात लग्न तुटलं...   मग शिवसेना आणि भाजप यांना बहुमत होतं त्यातील शिवसेना  याने आयुष्यभर ज्यांच्या विरोधात काम केलं त्या एनसीपी आणि काँग्रेस सोबत बसला...  आणि गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालून घेतली...   स्वतःच्या स्वार्थासाठी आम्ही वाटेल ते करू... आणि शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन बसली    मुख्यमंत्री पद स्वतःच्या गळ्यात पाडून घेतलं...   मी प्रत्येक सभेत ही गोष्ट सांगत आहे    याचं कारण मतदान होईपर्यंत ही गोष्ट तुमच्या डोक्यातून जातात कामा नये...   मग यांचा सरकार बसल्यावर अडीच वर्ष गेली लॉकडाऊन कोरोना मध्ये गेली...   मग यांच्या डांगे खालून चाळीस आमदार निघून गेले...   हा जगातील पहिला पक्ष असेल की जो सत्ताधारी पक्षातून 40 आमदारांनी निघून गेले...   आज पर्यंत विरोधी पक्षातून आमदार फुटलेले पाहिले होते पण सत्ताधारी पक्षातून पहिल्यांदा आमदार फुटलेले पाहिले...   मग शिंदे आणि भाजप अशी सरकार झाले    मग त्यांच्या लक्षात आलं की अजून एक तिसरा डोळा मारत आहे    मग अजित पवारला मांडीवर बसवलं...   अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केलं तेव्हा  त्याच्याबरोबर दहा दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की ज्यांनी 70 हजार कोटीचा घोटाळा केला त्यांना आम्ही सोडणार नाही...   सोडणार नाही याचा अर्थ आता कळला अच्छा असं सोडणार नाही का धरून ठेवलं...   तुम्हाला आठवते का कि तुम्ही कोणाला मतदान केलं    जो या विचारच केला त्याला जर तुम्ही मतदान केलं होतं तर त्यांना असं वाटेल की आपण  जे केलं ते योग्य केलं    मग हा महाराष्ट्र कोणालाच आवरता येणार नाही...   ही 2024 ची निवडणूक महत्त्वाची आहे...   आपल्याकडे रस्ते वाढत नाही आहेत...   हे सिलिंग बिलिंग करून काहीही फायदा होणार नाही...   आता एकनाथ शिंदे वगैरे यांच्या सरकार आलं तेव्हा यांनी काय केलं    इलेक्ट्रिक पोल ला लाइटिंग लावून ठेवल्या    सौंदर्यकरण म्हणतात कसला घंटा...   काय करायच आहे माहित नाही सेन्स नाही...   मुंबई आहे की डान्स बार आहे हेच कळत नाही...   या शहरात या मुंबईत सात आठ एजन्सी काम करतात... बीएमसी असेल एम एम आर डी असेल अशा सात आठ एजन्सी काम करतात...   या सगळ्यांना एकत्र करून यांची बैठक घ्यावी असं कोणालाही वाटत नाही...   एकदा राज ठाकरे ला संधी देऊन बघा माझे हात जोडून विनंती आहे...   पुढच्या पाच वर्षात अजून किती वाटोळं मी करू शकतो सांगा...    या ठिकाणाहून (बोरीवलीहून ) वर्सोवाला लाईव्ह सभा होणार आहे. त्यामुळे राज ठाकरे वर्सोवाला जाणार नाहीत.    आता राज ठाकरे यांची पुढची सभा डायरेक्ट प्रभादेवीमध्ये होणार आहे

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : धस-मुंडेंची भेट 28 दिवसांआधी झालेली, भेटीचं राजकारण करु नका
Chandrashekhar Bawankule : धस-मुंडेंची भेट 28 दिवसांआधी झालेली, भेटीचं राजकारण करु नका

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'आंतरधर्मीय विवाहाला लव्ह जिहाद म्हणणं चुकीचं' केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा कायद्याला विरोध
'आंतरधर्मीय विवाहाला लव्ह जिहाद म्हणणं चुकीचं' केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा कायद्याला विरोध
HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
Shikhar Dhawan : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
Video : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
ताक पिण्याचे '4' आरोग्यदायी फायदे!
ताक पिण्याचे '4' आरोग्यदायी फायदे!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : धस-मुंडेंची भेट 28 दिवसांआधी झालेली, भेटीचं राजकारण करु नकाSanjay Shirsat Nanded : स्वबळावर लढायचं तर आमची हरकत  नाही, आम्ही पण कमजोर नाहीSanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!Sanjay Gaikwad Dance Buldhana : आमदार संजय गायकवाड यांनी मुरळीवर धरला ठेका, दिलखुलास डान्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आंतरधर्मीय विवाहाला लव्ह जिहाद म्हणणं चुकीचं' केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा कायद्याला विरोध
'आंतरधर्मीय विवाहाला लव्ह जिहाद म्हणणं चुकीचं' केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा कायद्याला विरोध
HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
Shikhar Dhawan : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
Video : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
ताक पिण्याचे '4' आरोग्यदायी फायदे!
ताक पिण्याचे '4' आरोग्यदायी फायदे!
Ladki bahin yojana: सरकार अपात्र लाडक्या बहि‍णींचा टप्याटप्प्याने 'कार्यक्रम' करणार, महत्त्वाची अट टाकल्याने बहुतांश अर्ज बाद होणार
लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाचा नियम लागू, अपात्र महिला खटाखट बाद होणार
Chhaava Movie Review : तनामनात अंगार फुलवणारा ‘छावा’
Chhaava Movie Review : तनामनात अंगार फुलवणारा ‘छावा’
मोठी बातमी : अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, नाशिकवरुन काल तातडीने पुण्याला रवाना!
मोठी बातमी : अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, नाशिकवरुन काल तातडीने पुण्याला रवाना!
Anjali Damania : अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.