Mahayuti Meeting : शिंदे-फडणवीसांची रात्री साडेआठ वाजता 'रामगिरी'वर बैठक
भाजपनं दीडशे जागांचा आग्रह धरल्यानं महायुतीचं जागावाटप रखडलं...अजित पवार ६० जागांसाठी तयार, एबीपी माझाला सूत्रांची माहिती, आज रात्री रामगिरीवर शिंदे, फडणवीसांची बैठक
शिंदे-फडणवीसांची रात्री साडेआठ वाजता 'रामगिरी'वर बैठक --- अजित पवार, बावनकुळेही बैठकीत सहभागी होण्याची शक्यता ------- विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात बैठकीची शक्यता
राष्ट्रवादी महायुतीत६० हून अधिक जागा घेण्याच्या तयारीत,
आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये 60 पेक्षा अधिक जागा घेण्याच्या तयारीत
राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या 54 आमदार या सोबतच काँग्रेसचे तीन आमदार आणि अपक्ष तीन आमदार आपल्या सोबत असल्याचा अजित पवार यांचा युवकांच्या मेळाव्यात उल्लेख
काँग्रेसचे हिरामण खोसकर झिशान सिद्धकी आणि सुलभा खोडके लवकरच आपल्या सोबत येणार असल्याची अजित पवारांची माहिती
यासोबतच अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, संजय मामा शिंदे आणि शेकाप चे श्यामसुंदर शिंदे हे देखील आपल्या सोबत असल्याचे अजित पवारांचा उल्लेख
पक्षाचे स्वतःची 54 आमदार या सोबतच काँग्रेसचे तीन शेकाप एक आणि दोन अपक्ष या 60 जणांच्या व्यतिरिक्त आणखी देखील जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची अजित पवारांची माहिती
महायुतीत आपल्याला ज्या जागा मिळतील त्या जागांवर जास्तीत जास्त काम करा इतर जागांवर थोडं काम कमी केलं तरी हरकत नाही असाही स्पष्टपणे उल्लेख