(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dombivli Crime : खाजगी जमिनीवर उभा राहत असल्याचा वाद, चारचाकी अंगावर चढवण्याचा प्रयत्न
डोंबिवलीच्या दावडी परिसरातक क्षुल्लक कारणावरून वाद, वादानंतर अंगावर गाडी घालत फरफटत नेल्याची घटना, एक जण जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद, मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
HEADLINES:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्यातून आलेल्या मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक संपली, कुणाच्या तरी ताटातलं काढून दुसऱ्याला वाढायचं ही राज्य सरकारची भूमिका नाही, शंभूराज देसाई यांचा पुनरुच्चार
शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्यातल्या भ्रष्टाचारातून नारायण राणेंनी निवडणुकीचा खर्च काढला, आमदार वैभव नाईकांचा गंभीर आरोप, मोदींच्या हेलिपॅडसाठी जिल्हा नियोजनचा पैसा का खर्च केला, नाईकांचा सवाल..
अजित पवारांना भेटण्यामागे राजकीय कारण नाही, भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांत जाधवांचा दावा, निवडणूक लढणार का यावर मात्र ठोस उत्तर नाही
पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटाला मनसेचा विरोध, महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा, तर इतर राज्यांनाही चित्रपट प्रदर्शित करु न देण्याचं आवाहन
चंद्राबाबू नायडू तिरुपती देवस्थानाचं पावित्र्य मलीन करतायत, तिरुपतीच्या लाडू वादावर वायएसआर रेड्डींंची पहिली प्रतिक्रिया, पंतप्रधान नरेद्र मोदींना पत्र लिहून नायडूंना समज देण्याची विनंती
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार उघड, गळफास घेतलेल्या पतीच्या मृतदेहासमोर पत्नीची दुर्गाष्टमीची पूजा, पोलीस म्हणतायत पत्नी मनोरुग्ण...
सातारा जिल्ह्यातलं कास पठार फुललं, पण बेशिस्त वाहनचालकांमुळं ट्राफिक जाम, पाच ते सात किलोमीटर अंतरांपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा...
समृद्धी महामार्गावर एक वर्षांत ७५ हजार वाहनांवर कारवाई, एकूण सात कोटींचा दंड वसूल, अतिवेग ठरला सर्वाधिक मोडलेला नियम
शिर्डीच्या साईबाबांना १२ लाख रुपये किमतीचा हिरेजडीत मुकूट अर्पण, दानशूर भक्तानं नाव मात्र ठेवलं गुपित..
अनुरा दिसानायके श्रीलंकेचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता, मतमोजणीमध्ये घेतली विद्यमान राष्ट्राध्यक्ष विक्रमसिंगे यांच्यावर आघाडी...
चेन्नई टेस्टमध्ये भारताचा २८० धावांनी दणदणीत विजय, अश्विननं घेतल्या ६ विकेट्स तर जडेजानं ३, दोन सामन्यांच्या मालिकेत भारताची १-० नं आघाडी..