Nitin Gadkari Zero Hour : शरद पवार रिंगमास्टर, मविआ सर्कस; नितीन गडकरींची स्फोटक मुलाखत ABP MAJHA
Nitin Gadkari Zero Hour : शरद पवार रिंगमास्टर, मविआ सर्कस; नितीन गडकरींची स्फोटक मुलाखत ABP MAJHA
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी गेल्याच आठवड्यात एका भाषणातून राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते. बारामती मतदारसंघातील प्रचारसभेत बोलताना आता खासदारकीचे दीड वर्षे उरले आहेत, पुढे पुन्हा सभागृहात जायचं की नाही ते ठरवू, असे शरद पवार यांनी म्हटले होते. शरद पवारांच्या या भाषणाचा संदर्भ देत आता अजित पवारांनीही (Ajit pawar) राजकीय निवृत्तीबाबत वक्तव्य केलंय. बारामतीत 1967 पासून जेवढा निधी आणला नव्हता, तेव्हढा मी मागच्या पाच वर्षात आणला आहे. नदीला पाणी कुणी सोडलं ते डोक्यात आणा, कॅनॉल सोडला नसता तर काय अवस्था झाली असती. एकदा त्या पदावर गेल्यावर धमक असली पाहिजे. अधिकाऱ्याला फोन गेल्यावर तो अधिकार खुर्चीवरून उठला पाहिजे. सर.. सर.. केलं पाहिजे. पुढची लोक म्हणत आहेत अजित पवार निवडून आणले तर तो लायनिंग करेल. तुमचं पाणी जाईल.. मी काय येडा आहे का? मला कळत नाही का?, असे म्हणत अजित पवारांनी यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा निवडून देण्याचं आवाहन बारामतीकरांना (Baramati) केलं आहे. बारामतीत सुरक्षितता आहे, बारामतीत दहशत नाही असेही अजित पवार यांनी म्हटले. विशेष म्हणजे शरद पवारांनंतर आता अजित पवारांनीही राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत.