चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. पण तो गेल्या काही निवडणुकांपासून भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला झाला आहे.
पुणे : चिंचवड हा एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. पण तो गेल्या काही निवडणुकांपासून भारतीय जनता पक्षाचा (BJP) बालेकिल्ला झाला आहे. या मतदारसंघात भाजपमध्ये गेलेले बहुतांश स्थानिक नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. चिंचवडमध्ये विद्यमान आमदार अश्विनी जगताप आहेत. त्यामुळे ही जागा भाजपाकडेच आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीसाठी अश्विनी जगताप आणि त्यांचे दीर शंकर जगताप इच्छुक होते. दुसरीकडे महाविकास आघाडीकडेही इच्छुकांनी मोठी गर्दी केली असून, ही जागा कोणाला मिळणार? यावर अनेक समीकरणे अंवलबून आहेत. चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या शंकर जगताप यांच्या प्रचारासाठी शिवसेना ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार व नेते मोरेश्वर भोंडवे मैदानात उतरले आहेत. ऐनवेळी ठाकरेंची साथ सोडून कमळाचा प्रचार करण्यासाठी ते मतदारसंघात फिरत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. पण तो गेल्या काही निवडणुकांपासून भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला झाला आहे. या मतदारसंघात भाजपमध्ये गेलेले बहुतांश स्थानिक नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. चिंचवडमध्ये विद्यमान आमदार अश्विनी जगताप आहेत. त्यामुळे ही जागा भाजपाकडेच होती. भाजपने यंदा अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप यांना तिकीट दिलं आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून मोरेश्वर भोंडवे इच्छुक होते. त्यासाठी, त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेशही केला होता. मात्र, येथील मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला तिकीट मिळालं आहे. त्यामुळे, मोरेश्वर भोंडवेंनी ऐनवेळी निर्णय बदलत, भाजपला साथ दिली आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटेंची तुतारी फुंकण्याऐवजी भोंडवे सध्या कमळ फुलविण्यासाठी झटू लागले आहेत. हे नवं समीकरण सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा ठरत आहे. आमदार होण्याची इच्छा बाळगलेल्या भोंडवेंनी काहीही झालं तरी भाजपचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका सुरुवातीपासून घेतली होती. मात्र, अचानकपणे ते कमळाचा प्रचार कसं काय करू लागले? हा प्रश्न सध्या मतदारसंघात चर्चेत आहे.उद्धव ठाकरेंनी कारवाई केली तरी हरकत नाही, असं म्हणत भोंडवेंनी मविआचा धर्म धुळीस मिळवला आहे.
उद्धव ठाकरेंनाही आम्ही सांगितलं, कारवाईला तयार
गेल्या वेळेस तीनवेळा पराभूत झालेल्या उमेदवारा प्रचार आम्ही का करणार, आम्ही या भागचा विकास करण्यासाठी एकसंध राहणं महत्वाचं आहे. विकासासाठी महायुतीसोबत येणं आम्हाला गरजेचं आहे. समजा शंकरभाऊ निवडून आले आणि आम्ही दुसरीकडे आहोत, मग विकास करणं शक्य होईल का, असे म्हणत आपण प्रचारात उतरण्याचं कारण हे एकमेव विकास असल्याचंही भोंडवे यांनी म्हटलं आहे. उद्धव साहेबांनाही महाविकास आघाडीचा उमेदवार पसंत नाही, आम्ही पक्ष प्रवेशावेळी उद्धव साहेबांशी चर्चा केली होती, असा गौप्यस्फोटही भोंडवे यांनी केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी चुकीचं समीकरण जुळवत होती, त्यात ते यशस्वी झाले नाहीत. महाविकास आघाडीकडून एका सच्चा कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली असती तर ही वेळ आली नसती. सध्याचे उमेदवार हे आयात आहेत, असे म्हणत शंकर जगताप यांनी भूमिका मांडली.
हेही वाचा
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?