एक्स्प्लोर

नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?

बंगळूर पाठोपाठ चेन्नई आणि दिल्लीचा क्रमांक येतो. येथे अनुक्रमे 7.5% आणि 7.3% इतकी मजबूत पगार वाढ आहे. यामधून या रोजगार बाजारपेठांचे स्पर्धात्मक स्वरूप दिसून येते.

मुंबई: नोकऱ्यांच्या बाबतीत बंगळुरू आजही रोजगार संधी (Job) आणि वेतन वाढ देणारे भारताचे सर्वोच्च शहर म्हणून वर्चस्व गाजवत आहे. येथे मागील वर्षाच्या तुलनेत 9.3% वृद्धी निदर्शनास आली असून ही वाढ टेक्नॉलॉजी आणि व्यवसायाचे केंद्र म्हणून बंगळूरची जुनी ख्याती अधोरेखित करते. बंगळूरमधील (Benglore) सरासरी मासिक वेतन 29,500 रुपये आहे. ही बाब भारताचा आघाडीचा स्टाफिंग समूह टीमलीझ सर्व्हिसेसच्या ‘जॉब्स अँड सॅलरीज प्राइमर रिपोर्ट’मधून निदर्शनास आली आहे. या अहवालाने हंगामी आणि स्थायी नियुक्ती बाजारपेठांमधील एकीकृत वेतनाचे विश्लेषण करून निवडक शहरे आणि उद्योगांतील कल कसा आहे याबाबत महत्त्वपूर्ण माहिती प्रदान केली आहे.

बंगळूर पाठोपाठ चेन्नई आणि दिल्लीचा क्रमांक येतो. येथे अनुक्रमे 7.5% आणि 7.3% इतकी मजबूत पगार वाढ आहे. यामधून या रोजगार बाजारपेठांचे स्पर्धात्मक स्वरूप दिसून येते. चेन्नईमधील सरासरी मासिक वेतन 24,500 रुपये असून दिल्लीत ते 27,800 रुपये इतके आहे. मुंबई आणि अहमदाबाद येथे देखील स्थिर वेतनवाढ दिसून आली ज्यामधून प्रमुख रोजगार केंद्रे म्हणून त्यांचे महत्व पक्के होते. मुंबईतील सरासरी वेतन 25,100 रुपये आहे तर पुण्याचे सरासरी वेतन 24,700 रुपये असून त्यांनी आपली स्पर्धात्मक वेतन पातळी सांभाळली आहे. या शहरांमध्ये वेतनवाढ 4% ते 10% या श्रेणीत आहे. उद्योग आघाडीवर 8.4% वेतनवाढीसह सर्वश्रेष्ठ कामगिरी ‘रिटेल’ने केली आहे. हाच कल कन्झ्युमर ड्यूरेबल्स (5.2%) आणि बँकिंग आणि इतर सेवांमध्येही (5.1%) दिसून येतो तसेच या दोन्हींत व्यावसायिकांसाठी वृद्धीच्या दमदार संधी दिसत आहेत. दुसरीकडे, लॉजिस्टिक्स, एफएमसीजी, हेल्थकेअर आणि फार्मा, बांधकाम आणि रियल इस्टेट यांसारख्या क्षेत्रांत सामान्य वृद्धी दिसली आहे, जी कुशल व्यावसायिकांसाठीची त्यांची स्थिर मागणी दाखवते. सर्वाधिक वेतन देणाऱ्या उद्योगांमध्ये टेलिकम्युनिकेशन्स (29,200 रुपये), उत्पादन, इंजिनियरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर (28,200 रुपये), हेल्थकेअर आणि फार्मा (27,600 रुपये) आणि बांधकाम आणि रियल इस्टेट (27,000 रुपये) यांचा समावेश आहे.

टीमलीज सर्व्हिसेसच्या स्टाफिंग विभागाचे सीईओ कार्तिक नारायण म्हणाले, “हा अहवाल भारतातील रोजगार मार्केटमधील सकारात्मक चलन अधोरेखित करतो आणि विविध शहरे आणि उद्योगांत लक्षणीय पगार वाढ दर्शवितो. बंगळूरमधील 9.3% वेतनवाढ आणि रिटेलमधली दमदार 8.4% वाढ विशिष्ट कौशल्यांच्या वाढत्या मागणीकडे निर्देश करते. यामधून केवळ वेतन वृद्धीतील वाढ दिसत नाही, तर रोजगार मार्केटमध्ये होत असलेल्या सखोल बदलाचा अंदाजही येतो. कन्झ्युमर ड्यूरेबल्स आणि बांधकाम व रियल इस्टेट सारख्या क्षेत्रांमध्ये स्थायी आणि हंगामी नोकऱ्यांमधील वेतनातील अंतर कमी होणे दर्शविते की, कंपन्या प्रतिभेच्या समानतेवर आणि कर्मचाऱ्यांना दीर्घ काळ धरून ठेवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. हे कल भारतात कामाच्या भविष्याला आकार देण्यात अनुकूलता आणि कौशल्याचे वाढते महत्त्व अधोरेखित करत आहेत.”

हा अहवाल गेल्या पाच वर्षात नियमित वेतन वाढ देणाऱ्या काही विशिष्ट नोकऱ्यांवर देखील प्रकाश टाकतो. एफएमसीजी उद्योगात सर्वाधिक वृद्धी दिसते, ज्यात ट्रेनी असोसिएट आणि पायलट ऑफिसर या नोकऱ्यांसाठी अनुक्रमे 9.5% आणि 8% इतका जोरदार सीएजीआर आहे. त्याच्या पाठोपाठ बँकिंग आणि इतर उद्योगात एचआर एक्झिक्युटिव्ह्ज (7.9% सीएजीआर) आणि सेल्स मॅनेजर (6.6% सीएजीआर) यांना लक्षणीय दीर्घकालीन वृद्धी मिळालेली दिसते. शहरांचा विचार केल्यास, हैदराबाद येथे ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह (8.1% सीएजीआर), अहमदाबादेत बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह्ज (7.9% सीएजीआर), पुण्यात सेल्स मॅनेजर (6.8% सीएजीआर) आणि दिल्लीत डेटा कोऑर्डिनेटर (6.6% सीएजीआर) या विशिष्ट रोल्समध्ये चांगली वृद्धी दिसते आणि त्यातून उद्योग आणि शहरांत कुशल व्यावसायिकांची व्यापक मागणी प्रतिबिंबित होते.

तसेच, स्थायी आणि हंगामी रोल्ससाठी मिळणाऱ्या वेतनात समानता दिसते, खास करून कन्झ्युमर ड्यूरेबल्स, बांधकाम व रियल इस्टेट आणि अॅग्रिकल्चर व अॅग्रोकेमिकल्स यांसारख्या क्षेत्रात. या क्षेत्रांमध्ये वेतनातील फरक कमी आहे. कन्झ्युमर ड्यूरेबल्समध्ये हा फरक फक्त 6.3% आहे, बांधकाम व रियल इस्टेटमध्ये 7.8% आणि अॅग्रिकल्चर व अॅग्रोकेमिकल्समध्ये 7.9% तसेच रिटेलमध्ये 8.1% आहे. भारताचे रोजगार मार्केट सतत बदलत आहे आणि 2023-24 या आर्थिक वर्षासाठीचा ‘जॉब्स अँड सॅलरीज प्राइमर रिपोर्ट’ बँकिंग आणि अन्य, कन्झ्युमर ड्यूरेबल्स आणि एफएमसीजीसारख्या क्षेत्रांत विशिष्ट कौशल्यांची लवचिक मागणी, वेगवेगळ्या नोकऱ्यांमधील गतिशील वेतन वाढ आणि व्यावसायिकांसाठी अधिक उज्ज्वल भविष्य दर्शवितो.

हेही वाचा

मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Embed widget