एक्स्प्लोर

Kolhapur News : कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त

10 मतदारसंघापैंकी सर्वाधिक दारु जप्तीची कारवाई कोल्हापूर दक्षिण, करवीर, राधानगरी आणि चंदगड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक दारु जप्त करण्यात आली आहे. 

कोल्हापूर : विधानसभा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर राज्यात चांदा ते बांदा अवैध मुद्देमाल जप्त करण्याचा धडाकाच सुरुच असून कोल्हापूर जिल्ह्यातही मोठी कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत स्थिर सर्वेक्षण पथक (SST) राज्य पोलीस दल, राज्य उत्पादन शुक्ल विभाग, राज्य वस्तु व सेवा कर विभागाकडून या कारवाईमध्ये आतापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील  10 मतदारसंघापैंकी सर्वाधिक दारु जप्तीची कारवाई कोल्हापूर दक्षिण, करवीर, राधानगरी आणि चंदगड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक दारु जप्त करण्यात आली आहे. 

11 नोव्हेंबरपर्यंत मतदारसंघनिहाय केलेली धडक कारवाई 

चंदगड विधानसभा मतदारसंघ

रोख रक्कम 2 लाख, अवैध मद्य - 7 हजार 76.48 लिटर, मद्याची किंमत 27 लाख 8 हजार रुपये,  इतर अवैध मुद्देमाल 2 लाख 32 हजार असे एकूण 31 लाख 40 हजार. 

राधानगरी विधानसभा मतदारसंघ 

अवैध मद्य - 5 हजार 820.20 लिटर, मद्याची किंमत 16 लाख 41 हजार रुपये,  इतर अवैध मुद्देमाल 42 हजार याप्रमाणे  एकूण 16 लाख 83 हजार.  

कागल विधानसभा मतदारसंघ

रोख रक्कम 36 हजार, अवैध मद्य - 3 हजार 25.3 लिटर, मद्याची किंमत 6 लाख 99 हजार रुपये,  मौल्यवान धातू (सोने, चांदी)  10 लाख 93 हजार इतर अवैध मुद्देमाल 26 लाख 19 हजार याप्रमाणे एकूण 44 लाख 47 हजार 

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ 

रोख रक्कम 6 लाख 94 हजार, अवैध मद्य - 37 हजार 429 लिटर, मद्याची किंमत 39 लाख 77 हजार रुपये, अंमली पदार्थ 90 हजार, इतर अवैध मुद्देमाल 12 लाख 81 हजार याप्रमाणे एकूण 60 लाख 43 हजार. 

करवीर विधानसभा मतदारसंघ 

अवैध मद्य - 20 हजार 803.78 लिटर, मद्याची किंमत 18 लाख 51 हजार रुपये,  इतर अवैध मुद्देमाल 19 लाख 97 हजार याप्रमाणे एकूण 38 लाख 48 हजार 

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ 

रोख रक्कम 15 लाख 62 हजार, अवैध मद्य - 1 हजार 267.05 लिटर, मद्याची किंमत 5 लाख 55 हजार रुपये,  मौल्यवान धातू (सोने, चांदी) 5 कोटी 58 लाख 72 हजार,  इतर अवैध मुद्देमाल 6 लाख 98 हजार याप्रमाणे  एकूण 5 कोटी 86 लाख 87 हजार.

शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ 

अवैध मद्य - 2 हजार 274.81 लिटर, मद्याची किंमत 3 लाख 86 हजार रुपये,  इतर अवैध मुद्देमाल 9 लाख 72 हजार याप्रमाणे एकूण 13 लाख 58 हजार 

हातकणंगले विधानसभा मतदारसंघ

रोख रक्कम 1 लाख 34 हजार, अवैध मद्य - 17 हजार 156.15 लिटर, मद्याची किंमत 17 लाख 67 हजार रुपये,  मौल्यवान धातू (सोने, चांदी) 2 कोटी 3 लाख 77 हजार,  इतर अवैध मुद्देमाल 14 लाख 61 हजार याप्रमाणे  एकूण 2 कोटी 37 लाख 39 हजार 

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ

अवैध मद्य - 2 हजार 96.56 लिटर, मद्याची किंमत 3 लाख 62 हजार रुपये,  इतर अवैध मुद्देमाल 6 लाख 93 हजार  याप्रमाणे एकूण 10 लाख 55 हजार 

शिरोळ विधानसभा मतदारसंघ

अवैध मद्य - 20 हजार 5.56  लिटर, मद्याची किंमत 11 लाख 16 हजार रुपये,  इतर अवैध मुद्देमाल 19 लाख 88 हजार याप्रमाणे एकूण 31 लाख 3 हजार

असा एकूण रोख रक्कम 26 लाख 25 हजार, अवैध मद्य - 1 लाख 16 हजार 954.62 लिटर अवैध मद्याची किंमत 1 कोटी 50 लाख 62 हजार, अंमली पदार्थ 90 हजार, मौल्यवान धातू (सोने, चांदी इ.) 7 कोटी 73 लाख 42 हजार, इतर अवैध मुद्देमाल 1 कोटी 19 लाख 83 हजार असा एकूण 10 कोटी 71 लाख 3 हजार किंमतीचा मुद्देमाल विविध पथकांनी धडक कारवाईमध्ये जप्त केला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात 10 मतदार संघामध्ये स्थिर सर्वेक्षण पथकांची (SST) 44 स्थाने निश्चित करण्यात आली असून या ठिकाणी 128 स्थिर सर्वेक्षण पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच 41 VST, 22VVT, 75 FST पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील 8 तालुक्यात 15 जिल्हा व आंतरराज्य तपासणी नाके (चेकपोस्ट) उभारण्यात आले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget