IIT Student Darshan Solanki : दर्शन सोलंकीची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती
मुंबई IITच्या पवई कॅम्पसमधील दर्शन सोलंकी या विद्यार्थ्याने १२ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली... या संदर्भात त्याची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली असून त्यात एका विद्यार्थ्याने त्याला त्रास दिल्यास तसेच धमकी दिल्याचा आरोप केलाय... दर्शनच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी सहआयुक्त लखमी गौतम यांची SIT स्थापन केली होती... या समितीला दर्शनची सुसाईड नोट सापडलीय... विशेष म्हणजे या प्रकरणी 13 फेब्रुवारी रोजी मुंबई IIT नेही चौकशी समिती नेमली होती... आणि त्यांच्या अहवालानुसार विविध कोर्समधील दर्शनची शैक्षणिक कामगिरी सेमिस्टरच्या सेकंड हाफनंतर खालावली होती... त्याच्या खालावत जाणाऱ्या शैक्षणिक कामगिरीचा त्याच्यावर गंभीर परिणाम झाला असावा, असा अंदाज वर्तवण्याता आला होता...













