Share Market : शेअर बाजारात तेजी सुरु, आयटी आणि बँकिंगच्या शेअरमुळं बाजारानं मूड बदलला, जाणून घ्या कारण
Share Market : बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सेन्सेक्सवर 582 अंकांची तेजी पाहायला मिळाली. आज आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. या तेजीमुळं गुंतवणूकदारांना फायदा झाला.

Indian Stock Market News मुंबई : भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. बीएसईवर सेन्सेक्समध्ये 582 अंकांची तेजी पाहायला मिळाली. निफ्टी 50 निर्देशांकानं 25 हजारांचा टप्पा पार केला. आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील शेअरमुळं या क्षेत्रात जोरदार तेजी दिसून आली. शेअर बाजारातील तेजीमुळं गुंतवणूकदारांना जोरदार पाहायला मिळाली. जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतामुळं बाजाराला सपोर्ट मिळाला. बाजाराच्या जाणकारांच्या मते या तेजीच्या मागं अनेक कारणं असू शकतात.
1. आयटी शेअरमध्ये तेजी
6 ऑक्टोबरला आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. आयटी कंपन्यांच्या स्टॉकची जोरदार खरेदी झाली. गुंतवणूकदारांनी आयटी स्टॉक्सची खरेदी केल्यानं निफ्टी आयटी निर्देशांकावरील 10 शेअर तेजीत होते. निफ्टी आयटी निर्देशांकात 1.6 टक्के तेजी पाहायला मिळाली.
2.बँकिंग सेक्टरमध्ये खरेदी
बँकिंग शेअरमध्ये गेल्या चार दिवसांपासून जोरदार खरेदी गुंतवणूकदारांकडून करण्यात आली. एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या मजबुतीमुळं बँकिंग शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. बँक निफ्टीवरील सर्व 12 शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. गेल्या 5 दिवसांपासून बँकिंग शेअरमध्ये 3 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे. बाजार जाणकारांच्या मते खासगी क्षेत्रातील बँकांदेखील चांगली कामगिरी करु शकतात.
3.रुपया मजबूत
भारतीय शेअर बाजारात सोमवारी चांगली सुरुवात पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये तेजी पाहायला मिळाली. सुरुवातीच्या कारभारात रुपया पाच पैशांनी मजबूत होत 88.74 प्रति डॉलरवर पोहोचला आहे. रुपयामध्ये आलेल्या तेजीमुळं भारतीय बाजाराला सपोर्ट मिळाला आणि त्यामध्ये तेजी पाहायला मिळाली.
4. जागतिक बाजारातील सकारात्मक बदल
जागतिक बाजारातील तेजीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील पाहायला मिळाला. जागतिक बाजारातून येत असलेल्या सकारात्मक संकेतामुळं भारतीय बाजाराला आधार मिळाला. आशियातील बहुतांश बाजार तेजीत ट्रेड करत होते. जपानच्या निक्केई निर्देशांकात 225 अंकांची तेजी पाहायला मिळाली.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
























