एक्स्प्लोर
BMc Election : 'राज ठाकरे तर सोडाच, आम्ही उद्धवजींच्या सोबतही लढणार नाही', काँग्रेस नेते Bhai Jagtap यांचे मोठे विधान
मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला असून काँग्रेस नेते भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी एक मोठं विधान केलं आहे. आगामी मनपा निवडणुकीत काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) किंवा राज ठाकरे (Raj Thackeray) या दोघांसोबतही आघाडी करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. भाई जगताप यांनी थेटच सांगितले की, 'राज ठाकरे तो छोड़िये उद्धवजी के साथ भी हम नहीं लड़ेंगे।' ही भूमिका पक्षाच्या पॉलिटिकल अफेअर्स कमिटीच्या बैठकीत मांडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. जगताप यांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात आणि १४० वर्षांपासून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या कार्यकर्त्याला निवडणुकीत संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे मनसे (MNS) किंवा शिवसेनेसोबत (Shiv Sena) युती करण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता नसल्याने काँग्रेस मुंबईत स्वबळावरच लढेल, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















