एक्स्प्लोर

Sarangkheda Horse Market Nandurbar: सारंगखेडा अश्व बाजारात उसळली खरेदीची लाट; तीन दिवसांत तब्बल 67 लाखांची उलाढाल; यंदा विक्रमी व्यवहार होण्याचा अंदाज

Sarangkheda Horse Market Nandurbar: सारंगखेडा अश्व बाजारात अवघ्या तीन दिवसांत 145 घोड्यांची विक्री होऊन तब्बल 67 लाखांची उलाढाल झाली आहे.

Sarangkheda Horse Market Nandurbar: देशातील 'पुष्कर'नंतरचा सर्वात मोठा अश्व बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारंगखेडा (Sarangkheda Horse Market) यात्रेत यंदा विक्री–खरेदीला मोठी चालना मिळत आहे. अवघ्या तीन दिवसांत 145 घोड्यांची विक्री होऊन तब्बल 67 लाखांची उलाढाल झाल्याची माहिती चेतक फेस्टिव्हलचे आयोजक जयपालसिंग रावल (Jaipal Singh Rawal) यांनी दिली आहे.

या वर्षी आतापर्यंत ३ हजाराहून अधिक घोड्यांचे आगमन झाले असून, पुढील काही दिवसांत हा आकडा साडेतीन हजारांवर जाण्याची शक्यता आहे. पंजाब, काठेवाडी, मारवाडी आदी जातींचे घोडे मोठ्या प्रमाणावर दाखल होत असून, देशभरातील व्यापारी, खरेदीदार आणि घोड्यांचे पालन करणारे या यात्रेला हजेरी लावत आहेत.

Sarangkheda Horse Market Nandurbar: साडेपाच कोटीहून अधिकची उलाढाल होणार?

अश्व बाजारातील उत्साह आणि खरेदीची वाढती मागणी लक्षात घेता यंदाची उलाढाल तब्बल साडेपाच कोटी रुपयांहून अधिक होईल, असा अंदाज आयोजक जयपालसिंग रावल यांनी व्यक्त केला. यात्रेत दररोज मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असून, अनेक वर्षांतील हा सर्वाधिक विक्रीचा हंगाम ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Sarangkheda Horse Market Nandurbar: व्यवहारात नवे विक्रम नोंदवले जाणार?

पारंपारिक घोडेविक्रीची परंपरा, देशभरातून दाखल होणाऱ्या उत्कृष्ट जातीचे अश्व आणि या बाजाराची ऐतिहासिक ओळख यामुळे सारंगखेडा यात्रा दरवर्षी व्यापाऱ्यांचे आकर्षण आहे. यंदा यात्रेला अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने व्यवहारात नवे विक्रम नोंदवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Sarangkheda Horse Market Nandurbar: पुण्यातील भाजप आमदाराच्या मुलाचं अश्वप्रेम

दरम्यान,  दौंडचे भाजप आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांचे सुपुत्र आदित्य कुल (Aditya Kul) यांनी सारंगखेडा अश्वबाजारातून तब्बल 11 लाख 11 हजार 111 रुपये देऊन नुकरा जातीची घोडी खरेदी केली आहे. नुकरा ही अत्यंत मौल्यवान आणि मागणी असलेली घोड्यांची जात मानली जाते. उंच, सडपातळ आणि रुबाबदार शरीरयष्टी ही या जातीची खास ओळख. या घोड्यांची किंमत लाखांतून कोट्यवधींपर्यंत जाते. उत्कृष्ट शारीरिक क्षमता आणि स्वभावामुळे ही जात विशेष मानली जाते.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik Tree Cutting: इकडं तपोवनातील वृक्षतोडीविरोधात एल्गार सुरु असतानाच गिरीश महाजन राजमुद्रीला पोहोचले, नाशिकमध्ये 15 हजार देशी झाडांची लागवड करणार

Nightclub Fire in Goa: स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?

१७ वर्षापासून पत्रकारितेचा अनुभव,   कृषी विषयक पत्रकारीते पासून सुरुवात
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
Prakash Ambedkar on Badlapur Nagarsevak: भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
पुण्यात मेट्रो मोफत, अजित पवारांची घोषणा; पण महापालिकेला अधिकार आहे का? सध्या प्रवासी, तिकीट उत्पन्न किती?
पुण्यात मेट्रो मोफत, अजित पवारांची घोषणा; पण महापालिकेला अधिकार आहे का? सध्या प्रवासी, तिकीट उत्पन्न किती?
Embed widget