एक्स्प्लोर
PassportScam: 'आमचा पक्ष असो वा दुसरा, थारा नाही', Nilesh Ghaywal प्रकरणी CM Fadnavis कडाडले!
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) याला पासपोर्ट मिळाल्याच्या प्रकरणावरून राजकारण तापले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिले आहे. 'माझं मत अतिशय स्पष्ट आहे, अशाप्रकारची जी प्रवृत्ती आहे त्याला दुसरा पक्ष असो का आमचा पक्ष असो, कोणीही त्याला थारा देता कामा नये; अशा प्रवृत्तीवर कारवाई केलीच जाईल,' असे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले आहे. घायवळ राहत नसतानाही त्याला पासपोर्ट कसा मिळाला, यासाठी कोणाचा राजकीय दबाव होता आणि निवडणुकीत त्याने कोणासाठी काम केले होते, या सर्व बाबींचा तपास केला जाणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी चुकीचा अहवाल देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. घायवळच्या बनावट कागदपत्र आणि राजकीय संबंधांमुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले असून, मुख्यमंत्र्यांच्या कठोर भूमिकेमुळे आता कोणते नेते अडचणीत येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















