Maharashtra News : एबीपी माझानं दाखवलेल्या ३ बातम्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दखल
गेल्या २४ तासात एबीपी माझानं दाखवलेल्या ३ बातम्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेतलीय... सोलापुरातील ट्रॉमा सेंटरबाबतची बातमी आज सकाळी एबीपी माझानं दाखवली त्यानंतर लगेच प्रशासनाला आदेश देत सोलापुरातील ट्रॉमा केअरचा विषय मार्गी लावणार अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलीय... तर सोलापूरच्या बस अपघातातील दुखापत ग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आता ५० हजारांची मदत केली जाणार असल्याचीही माहिती दिलीय... तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे वाहून गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तातडीनं नव्यानं पूल बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत तातडीनं नव्यानं पूल बांधण्याचे निर्देश दिलेयत... आणि काल संध्याकाळी एबीपी माझानं नायगावच्या बीडीडी चाळीतील पोलिसांना म्हाडानं ४८ तासात घर रिकामं करण्याचे निर्देश दिले होते... त्यावर मुख्यमंत्र्यांनी दखल घेत म्हाडाला ही कारवाई थांबण्याचे आदेश दिले...