(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MLC Results : अकोल्यात आघाडीची 80 मतं फुटली अन् भाजपचा 'वसंत' फुलला, खास रिपोर्ट
Nagpur MLC Election Result: विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपेक्षित विजय मिळवताना काँग्रेसच्या मतपेढीला सुरुंग लावला. बावनकुळे यांना भाजप आणि मित्रपक्षांची मते मिळालीच शिवाय त्यांनी काही महाविकास आघाडीची मते मिळाली असल्याचे समोर आले आहे.
भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली. काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक छोटू भोयर यांना एक मत मिळाले. महाविकास आघाडीची जवळपास 16 मते फुटली असल्याचे समोर आले.
दभाजपने महाविकास आघाडीला दुसरा धक्का दिला तो अकोला-वाशिम-बुलढाण्याच्या जागेवर. अकोला-वाशिम-बुलढाण्याची जागा भाजपनं शिवसेनेकडून खेचून घेतली. तिथं याआधी तीनवेळा विजय मिळवलेले शिवसनेचे गोपीकिशन बाजोरिया तब्बल 109 मतांनी पराभूत झालेत. बाजोरिया यांना 334 मतं पडली. त्यामुळे 109 मतांनी बाजोरिया पराभूत झालेत. अकोल्यातही महाविकास आघाडीची तब्बल 80 मतं फुटल्याचं समोर आलंय. इथे सुद्धा बलाढ्य उमेदवाराविरोधात भाजपनं विजयाची किमया कशी साधली आणि महाविकास आघाडीला पराभवाची धुळ कशी चारली बघुयात या स्पेशल रिपोर्टमधून.