एक्स्प्लोर

Akshay Shinde Parents ReAction : एन्काऊंटरनंतर अक्षय शिंदेच्या आई-वडिलांची पहिली प्रतिक्रिया

Akshay Shinde Parents ReAction : एन्काऊंटरनंतर अक्षय शिंदेच्या आई-वडिलांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला असून त्यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. बदलापूर प्रकरणातील खरे आरोपी समोर येऊ नयेत म्हणून गृहमंत्र्यांनी पोलिसांना एन्काऊंटरचे आदेश दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणातील संस्थाचालक आणि इतर आरोपींना वाचवण्यासाठी हा एन्काऊंटर केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. मृत अक्षय शिंदेच्या आईची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. आपला मुलगा रस्ता क्रॉस करतानाही हात पकडायचा, तो पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊच शकत नाही अशी प्रतिक्रिया अक्षय शिंदेच्या आईने दिली आहे. 

टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये अक्षय शिंदेची आई म्हणाले की, माझा मुलगा असं करूच शकत नाही. बाहेर रस्ता क्रॉस करतानाही तो माझा हात पकडायचा, रस्ता क्रॉस करतानाही तो गाड्यांना घाबरायचा. असा मुलगा पोलिसांची बंदूक कशी काय हिसकावून घेऊ शकतो? 

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. आरोपीचा एन्काऊंटर करून गृहमंत्र्यांनी कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला. या प्रकरणामुळे महाराष्ट्र बदनाम होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर

बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला पोलिस तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रान्चला घेऊन जात होते, त्यावेळी हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदेने पोलिस कॉन्स्टेबलची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांना लागली गोळी लागली. त्यानंतर  एपीआय निलेश मोरे यांनी स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली. यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी 6.30 च्या आसपास पोलिसांची टीम मुंब्रा बायपास जवळ आली. त्यावेळी ही घटना घडल्याची माहिती आहे.  

अक्षय शिंदेवर तीन  गोळ्या झाडल्या

पोलिसांनीही स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर तीन  गोळ्या झाडल्या. पोलिसांच्या गोळीबारामुळं जखमी झालेल्या अक्षयला कळवा रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी अक्षय शिंदेला मृत घोषित केलं. जखमी झालेल्या एपीआय निलेश मोरेंवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 11 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : 'इंडिया'आघाडी दिल्लीत फुटणार? ते मुंबईतील रखडलेल्या पुलांची समस्याZero Hour Mumbai Mahapalika :महापालिकेचे महामुद्दे :मुंबईत रखडलेल्या पुलांची समस्या अन् वाहतूक कोंडीZero Hour :विरोधकांची इंडिया आघाडी दिल्लीत फुटणार? Anand Dubey Atul Londhe Keshav Upadhyay EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Embed widget