(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar on Petrol Diesel Price : तूर्तास तरी महाराष्ट्रात सरकारचा इंधन कर कपातीचा विचार नाही
Maharashtra Petrol Diesel Update : सध्या तरी राज्याला उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. अजून आर्थिक घडी नीट बसलेली नसून पगार आणि दैनंदिन खर्च तसाच असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्यावरील राज्यांचा कर कमी होण्याची शक्यता नाही, असं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते. आज कार्तिकी एकादशी (Kartiki Eksadashi) निमित्त त्यांच्या हस्ते सपत्नीक पूजा पार पडली. त्यानंतर ते बोलत होते.
त्यांनी म्हटलं की, पेट्रोल आणि डिझेलच्यावरील राज्यांचा कर कमी होण्याची शक्यता नाही. तरीही येत्या अधिवेशनापूर्वी कर कमी करायचे असतील तर किती आर्थिक नुकसान सोसावे लागेल ते पाहून निर्णय घेणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. सध्या तरी राज्याला उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. अजून आर्थिक घडी नीट बसलेली नसून पगार ,पेन्शन आणि दैनंदिन खर्च तसाच असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या वरील राज्यांचा कर कमी होण्याची शक्यता नाही. तरीही येत्या अधिवेशनापूर्वी कर कमी करायचे असतील तर किती आर्थिक नुकसान सोसावे लागेल ते पाहून निर्णय घेतला जाईल, असं अजित पवार यांनी सांगितले.