ABP Majha Marathi News Headlines 630AM TOP 630 AM 26 November 2024 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 630AM TOP 630 AM 26 November 2024 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स
लाडके बहिणींच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार. नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपर्यंत काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार.
भाजपाला मुख्यमंत्री पद जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती.
दिल्लीतून निरोप आल्यान एकनाथ शिंदे नाराज.
नव्या सरकारचा शपथविधी दोन डिसेंबरला होण्याची शक्यता, अमित शहा मुंबईमध्ये येऊन लवकरच घोषणा करणार असल्याची सूत्रांची माहिती.
येत्या जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांची शक्यता, शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांची माहिती.
रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदी पुन्हा नियुक्ती, आज पदभार स्वीकारणार.
ही बातमी पण वाचा
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला (Mahayuti) राज्यात घवघवीत यश मिळालं असून 288 मतदारसंघांतील निवडणुकांपैकी तब्बल 237 जागांवर भाजप महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे, महायुतीचं सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झालं आहे. मात्र, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन चांगलच रणकंदन माजलं आहे. त्यातच, मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याचा निर्णय दिल्लीत झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) नाराज झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देवगिरी बंगल्यातून सुरक्षेशिवाय बाहेर पडल्याचे समजते. एकीकडे राज्यात मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं राजकारण व घडामोडी घडत असताना अजित पवार हे अचानक दिल्लीला गेल्याची चर्चाही मुंबईतील त्यांच्या बंगल्याबाहेर सुरू आहे.
![City 60 News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 February 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/8a28998de4e3921a4f67ae6c85823c73173937207628890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Uday Samant PC on Sharad Pawar Meet : शरद पवारांच्या भेटीनंतर उदय सामंत काय म्हणाले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/728348f04fec0d176d370d33cd0ffe95173937237709990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 08 PM : 12 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/e7ad8e871fdc6736d01832fe97a46e71173937205182490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rajan Salvi Resigned Shivsena: मातोश्रीशी इमान राखलेल्या निष्ठावंताचा रामराम, राजन साळवींचा राजीनामा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/420e778b83e66a6894c23c83877c0108173936318198590_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 05 PM : 12 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/1e86bed809a893fbb134c6a782018ced173936301731990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)