Beed Madhav Jadhav : निवडणूक काळात माधव जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी अखेर कैलास फडवर गुन्हा दाखल करण्यात आला... हवेमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी यापूर्वीच कैलास फडला अटक सुद्धा झाली होती. कैलास फड हा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे...गुन्हा नोंदवण्यास एवढा विलंब का लागला? असा सवाल माधव जाधव यांनी उपस्थित केलाय. तर धनंजय मुंडे, वाल्मीक कराडमुळेच माधव जाधवांना मारहाण झाल्याचा आरोप राजेसाहेब देशमुखांनी केलाय.
दरम्यान यावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी यावर प्रतिक्रिया दिलीये....मारहाण करणारे आकाच्या मुलाचे गुंड म्हणून फिरत होते, असा आरोप सुरेश धस यांनी केलाय...
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेला, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय... सीआयडीने सुदर्शन घुलेची पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती... त्यामुळे आता १४ फेब्रुवारीला सुदर्शन घुलेला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले जाईल... त्याच्यावर आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्प चालकाकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा.. आणि संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सहभागी असल्याचा गुन्हा दाखल आहे...






















