महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, अन्यथा उडवून टाकू; हाती बंदूक घेऊन अजित दादांचा मिश्कीलपणे इशारा
महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, अन्यथा आम्ही दोघे तुम्हा सर्वांना उडवून टाक, अशा शब्दात अजित पवारांनी आपल्या हाती असलेली ए.के.47 मीडियावाल्यांच्या दिशेने वळवली.

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) आज पुणे दौऱ्यावर होते. दोन्ही नेत्यांच्याहस्ते पुण्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. पुण्याीतल चाकणमध्ये आधुनिक क्षेपणास्त्र संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालं. त्यावेळी दोघांनी ए.के. 47 चा अनुभव घेतला अन् त्यामार्फत अनेकांवर निशाणा साधला. अजित पवारांच्या बाजुलाच उभे असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना अजितदादांनी लक्ष्य केलं. गेल्या काही दिवसांपासून बीडमधील घटना, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे अजित पवार व धनंजय मुंडे हे माध्यमांच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळेच, आज संधी भेटताच अजित पवारांनी मिश्कीलपणे माध्यमांवर निशाणा साधला. महायुतीच्या (Mahayuti) चांगल्या बातम्या द्या, अन्यथा आम्ही दोघे तुम्हा सर्वांना उडवून टाक, अशा शब्दात अजित पवारांनी आपल्या हाती असलेली ए.के.47 मीडियावाल्यांच्या दिशेने वळवली. यावेळी, मिडिया प्रतिनिधींमध्येही हशा पिकला.
पुण्यातील तळेगाव एमआयडीसी येथे आयोजित 'Lotte India Plant Manufacturing' च्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार सहभागी झाले होते. तसेच, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या विविध विकासकामांच्या आणि उपक्रमांच्या उद्घाटन, भूमिपूजन आणि लोकार्पणाचा समारंभ संपन्न झाला. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय नवीन प्रशासकीय इमारत, पुणे पोलीस अधीक्षक कार्यालय भूमिपूजन आणि महाळुंगे औद्योगिक पोलीस संकुल व देहू रोडवरील पोलीस विश्रामगृह या इमारतींचं भूमिपूजन समारंभ पार पडलं. पुण्यातील या विविध विकासकामांच्या सोहळ्यादरम्यान दोन्ही नेत्यांनी माध्यम प्रतिनिधींची फिरकी घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एके 47 हातात घेत मिश्कीलपणे अनेकांवर निशाणा साधला. राज्याच्या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या नजरेत असणाऱ्यांवर नेम धरला. अजित दादांनी तर थेट मीडियाचे प्रतिनिधी आणि कॅमरामेनचा एके 47 ने वेध घेतल्याचं यावेळी पाहायला मिळालं. महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, अन्यथा आम्ही दोघे तुम्हा सर्वांना उडवून टाकू, अशी मिश्किल टिपणी करत अजित दादांनी मीडियावर निशाणा साधला. पुण्याच्या चाकणमध्ये आधुनिक क्षेपणास्त्र संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालं. त्यावेळी दोघांनी एके 47 चा अनुभव घेतला अन त्यामार्फत अनेकांवर निशाणा साधला. सध्या अजित पवारांचा हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायर होत असून माध्यमांच्या दिशेने अजित पवारांनी बंदूक ओवळून मिश्कीलपणे टिपण्णी केल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

