एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 11 AM : 25 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines :  11 AM : 25 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय पटावर आपले फासे टाकायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे अनेक बडे नेते शरद पवार गटाच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. यामध्ये आज भाजपचे साताऱ्यातील नेते मदन भोसले यांचाही समावेश झाला. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी सकाळी मदन पाटील यांची भेट घेतली.  जयंत पाटील हे मदन भोसले यांच्या घरी गेले होते. याठिकाणी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर बंद दाराआड चर्चा झाल्याचे समजते. या भेटीत जयंत पाटील यांनी मदन भोसले यांच्यासमोर शरद पवार गटात येण्याचा प्रस्ताव मांडला असावा, अशी शक्यता आहे. या दोन्ही नेत्यांची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. मदन भोसले हे शरद पवार गटात गेल्यास वाई मतदारसंघातील समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. जयंत पाटील हे मदन पाटील यांच्या घरातून हसतहसत बाहेर पडले. मात्र, त्यांनी भेटीबाबत काही बोलण्यास नकार दिला. भाजपमधील सर्वजण माझे मित्र आहेत, अशी मोघम प्रतिक्रिया देत जयंत पाटील यांनी तेथून काढता पाय घेतला. मात्र, आता मदन भोसले भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या गोटात दाखल होणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.   गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या अनेक बड्या नेत्यांना शरद पवार गटाने गळाला लावल्याची चर्चा सुरु आहे. यापैकी कोल्हापूरमध्ये समरजीत घाटगे यांनी आपण शरद पवार गटात जाणार, हे जवळपास स्पष्टच केले आहे. त्यानंतर आता हर्षवर्धन पाटील, मदन भोसले हे हातात तुतारी धरतील, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. याशिवाय, अजितदादा गटाचे आमदार अतुल बेनके यांनीही रविवारी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे तेदेखील लवकर शरद पवार गटात जातील, अशी चर्चा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय पटलावर शरद पवारांनी टाकलेले हे डाव आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला आणि महायुतीला जेरीस आणतील, अशी चिन्हे आता दिसत आहेत. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : विधानसभेला मविआ 170 ते  175 जागा जिकेल; राऊतांचा विश्वास
Sanjay Raut Full PC : विधानसभेला मविआ 170 ते 175 जागा जिकेल; राऊतांचा विश्वास

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Delhi CM Arvind Kejriwal : तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
Nagpur Hit & Run case: नागपूर हिट अँड रन प्रकरणात लेकरु अडचणीत, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी अमित शाहांनाही काहीच बोललो नाही
मी मुलासाठी पोलिसांवर दबाव आणला नाही, अमित शाहांनाही काहीच बोललो नाही: चंद्रशेखर बावनकुळे
Arvind Kejriwal : मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 
मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : विधानसभेला मविआ 170 ते  175 जागा जिकेल; राऊतांचा विश्वासAshish Desmukh On BJP :  धनंजय मुंडे, वळसे पाटील यांच्यावर आशिष देशमुखांचा गंभीर आरोप #abpमाझाArvind Kejriwal Bail : अरविंद केजरीवाल पुन्हा मैदानात! कोर्टाकडून जामीन मंजूरLadki Bahin Yojana Scam : लाडकी बहिणींच्या पैशांवर डोळा, पुरुषांच्या फॉर्मवर महिलांचे फोटो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Delhi CM Arvind Kejriwal : तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
Nagpur Hit & Run case: नागपूर हिट अँड रन प्रकरणात लेकरु अडचणीत, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी अमित शाहांनाही काहीच बोललो नाही
मी मुलासाठी पोलिसांवर दबाव आणला नाही, अमित शाहांनाही काहीच बोललो नाही: चंद्रशेखर बावनकुळे
Arvind Kejriwal : मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 
मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 
Laser Lights Banned in Kolhapur : दोन डोळे जायबंदी होताच कायद्याचे डोळे उघडले; कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सवर बंदी!
दोन डोळे जायबंदी होताच कायद्याचे डोळे उघडले; कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सवर बंदी!
एकीकडे राज ठाकरेंची भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका, दुसरीकडे पंढरपुरातील मनसेचे उमेदवार मुस्लीम मतदारांना घेऊन निघाले अजमेर शरीफला
एकीकडे राज ठाकरेंची भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका, दुसरीकडे पंढरपुरातील मनसेचे उमेदवार मुस्लीम मतदारांना घेऊन निघाले अजमेर शरीफला
मुंबईत शिंदेंच्या आमदाराकडून मुस्लीम महिलांना बुरखा वाटप, महायुतीत वादाची ठिणगी, भाजप आक्रमक
मुंबईत शिंदेंच्या आमदाराकडून मुस्लीम महिलांना बुरखा वाटप, महायुतीत वादाची ठिणगी, भाजप आक्रमक
Bigg Boss Marathi Aarya Jadhao : जेल की घराबाहेर गच्छंती? निक्कीला मारहाण केल्याने आर्याला बिग बॉस कोणती शिक्षा देणार?
जेल की घराबाहेर गच्छंती? निक्कीला मारहाण केल्याने आर्याला बिग बॉस कोणती शिक्षा देणार?
Embed widget