एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Aarya Jadhao : जेल की घराबाहेर गच्छंती? निक्कीला मारहाण केल्याने आर्याला बिग बॉस कोणती शिक्षा देणार?

Bigg Boss Marathi Aarya Jadhao Nikki Tamboli : निक्कीच्या कानशिलात लगावल्याने आर्याला आता कोणती शिक्षा मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Bigg Boss Marathi Aarya Jadhao Nikki Tamboli : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात नुकताच पार पडलेल्या कॅप्टनसी टास्कने सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. कॅप्टनसी टास्कदरम्यान आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावल्याने घरातील वातावरण एका क्षणात बदलले आहे. निक्कीने आर्याने मला मारलं असल्याचे सांगत बिग बॉसकडे आर्याला शिक्षा देण्याची मागणी केली. आजच्या एपिसोडमध्ये आता बिग बॉस आर्याला कोणती शिक्षा देणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. आर्याला जेल होणार की  बिग बॉसच्या घराचा नियम मोडल्याने थेट घराबाहेर गच्छंती होणार हे आजच्या एपिसोडमध्ये स्पष्ट होईल. 

काय झालं नेमकं?

नव्या कॅप्टन्सी पदाच्या टास्कदरम्यान जादुई हिरा मिळवण्यासाठी अंकिता, वर्षा ताई, जान्हवी, निक्की आणि आर्या यांच्यात चढाओढ झाली. यात जादुई हिरा मिळवण्याच्या झटापटीत आर्या आणि निक्की यांच्यात जोरात जुंपली. निक्की आणि आर्याच्या या भांडणाचे रूपांतर नंतर झटापटीत आणि त्यानंतर कानशि‍लात लगावण्यापर्यंत गेले. कानशिलात लगावल्यानंतर निक्कीने 'बिग बॉस'ला सांगितले की, "आर्याने मला मारलंय...मी हे सहन करू शकत नाही". बिग बॅास यांनी आर्याच्या या कृत्याचा निषेध केला असून यात तिला काय शिक्षा होईल हे आजच्या एपिसोडमध्ये स्पष्ट होईल. 

बिग बॉसने सुनावणार शिक्षा....

'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत,"घरात आर्या आणि निक्की यांच्यामध्ये एक निंदनीय घटना घडली. आर्या यांनी हे निंदनीय कृत्य करुन बिग बॉसच्या मुलभूत नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे बिग बॉस आर्या यांना आता शिक्षा ठोठावत आहे". निक्कीच्या कानशिलात लगावत आर्याने 'बिग बॉस'च्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे बिग बॉस आर्याला काय शिक्षा ठोठावणार? हे जाणून घेण्याची सर्वांनाच आता उत्सुकता आहे. कानशिलात लगावल्यानंतर निक्कीने बिग बॉसला आर्याला घरी पाठवा अशी मागणी केली होती.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

जेल की घराबाहेर गच्छंती?

'बिग बॉस'च्या घरातील नियमांचे उल्लंघन केल्याने सदस्याला थेट घराबाहेर पडावे लागले आहे. याआधीच्या सीझनमध्येही एका स्पर्धकाने महिला स्पर्धकाच्या कानशि‍लात लगावल्याने त्याला घराबाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे आर्याला देखील घराबाहेर काढणार का? की तिला घरातील जेलमध्ये डांबण्यात येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

The Kapil Sharma Show Comedian: 'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
TV Show C.A.T.S. : 32 एपिसोड, 3 अभिनेत्री; दोघींनी आयुष्याचा दोर कापला, एक इंडस्ट्रीतून गायब, 'ती' शापित मालिका कोणती?
32 एपिसोड, 3 अभिनेत्री; दोघींनी आयुष्याचा दोर कापला, एक इंडस्ट्रीतून गायब, 'ती' शापित मालिका कोणती?
Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget