एक्स्प्लोर

'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील हे दोन मंत्री विदर्भात भाजप नेत्यांऐवजी महाविकास आघाडीतील माजी मंत्रांना साथ देतात, असे आरोप भाजप नेत्याने केला आहे.

नागपूर : महायुतीत (Mahayuti) भाजपसोबत (BJP) सत्तेत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP Ajit Pawar Group) काही मंत्री विदर्भात भाजपपेक्षा महाविकास आघाडी सरकार काळात असलेल्या मंत्र्यांना साथ देत असल्याचा गंभीर आरोप विदर्भातील भाजप नेत्याने केला आहे. यामुळे महायुतीत पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) हे दोन मंत्री विदर्भात भाजप नेत्यांऐवजी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) माजी मंत्रांना साथ देतात, असा अत्यंत गंभीर आरोप भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केला आहे. 

धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटलांवर गंभीर आरोप

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सहकार कायद्यानुसार आरोपी सुनील केदार (Sunil Kedar) आणि इतर दोषी संचालकांकडून प्रस्तावित वसुलीच्या प्रकरणात दिलीप वळसे पाटील वारंवार सुनावणी टाळून सुनील केदार यांना साथ देत आहेत. सोबतच कृषी मंत्री धनंजय मुंडे अनिल देशमुखांच्या सांगण्यावरून निर्णय करत असल्याचा आरोप आशिष देशमुख यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.  

भाजपच्या श्रेष्ठींना सांगूनही काहीच होत नाही

12 सप्टेंबर रोजी विदर्भातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंत्रालयात एक विशेष बैठक बोलावण्यात आली होती. मात्र अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या दबावाखाली धनंजय मुंडे यांनी ती बैठक अचानक रद्द केली. त्यामुळे कृषी मंत्री असूनही धनंजय मुंडे यांना शेतकऱ्यांच्या हिताची काळजी नाही, उलट ते आपले पूर्वीचे सहकारी अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून काम करत आहेत.  भाजपच्या श्रेष्ठींना यासंदर्भात सांगूनही काहीच होत नाही. दिलीप वळसे पाटील तर सुनील केदार यांच्या प्रकरणी आमच्या श्रेष्ठींचाही ऐकत नाही, असे आशिष देशमुख यांनी म्हटले आहे. आता यावर धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील काय उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेपूर्वी काँग्रेसला हादरा, आणखी एक आमदार भाजपमध्ये जाणार? गडकरींच्या भेटीनंतर घडामोडींना वेग

मोठी बातमी! विदर्भात महायुतीला फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्वेत धक्कादायक माहिती, कोणत्या पक्षाला किती जागा?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 3rd Test : पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  18 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :18 डिसेंबर 2024 : ABP MajhaOne Nation One Election : एक देश एक निवडणूक घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 3rd Test : पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
Embed widget