(Source: ECI/ABP News/ABP Majha)
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM : 13 September 2024 : ABP Majha
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM : 13 September 2024 : ABP Majha
अरविंद केजरीवालांना जामीन मंजूर, १० लाख रुपयांच्या दोन वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर, सीबीआयने दाखल केलेल्या खटल्यात मद्यविक्री घोटाळा केसमध्ये केजरीवालांना जामीन
हा जनतेचा सर्वे नाही, मनाला शांत करणारा सर्वे. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेबाबत बावनकुळेंची प्रतिक्रिया, बहुमताने महायुती सत्तेत बसेल बावकुळेंनी व्यक्त केला विश्वास.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी १७० ते १७५ जागांवर विजय मिळवणार, खासदार संजय राऊतांचा दावा, तर जागावाटपाबाबत एकत्रित बसून चर्चा करू, राऊतांची माहिती.
महायुती महाराष्ट्रात बहुमतापेक्षा जास्त आकडा गाठणार, मंत्री शंभूराज देसाईंचा दावा, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व्हावे अशी दगडूशेठचरणी प्रार्थना केल्याची देसाईंची मागणी.
विधानसभेसाठी काँग्रेसचा तीन पातळीवर जाहीरनामा, राज्य, जिल्हा,मतदारसंघ पातळीवर तीन जाहीरनामे, मुस्लीम समाजाकडेही जाहीरनाम्यात विशेष लक्ष, कर्नाटक, तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही काँग्रेसच्या विविध गॅरंटी.
केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात येणार, विधानसभा निवडणूक घोषित करण्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक राज्याचा आढावा घेणार.
राहुल गांधींविरोधात संभाजीनगरच्या क्रांती चौकात अतुव सावेंच्या नेतृत्वात भाजपचं आंदोलन, आरक्षण संपुष्टात आणण्यासंदर्भातील राहुल गांधींच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध.
नाशिकमध्ये भाजपचं राहुल गांधींविरोधात आंदोलन, भाजप आणि अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने आंदोलन सुुरू, यावेळी राहुल गांधी आणि काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी.
अकोल्यात राहुल गांधींविरोधीत निषेध आंदोलन, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात आंदोलन,अमेरिकेत आरक्षणासंदर्भातील कथित वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक.