ABP Majha Headlines 7AM | एबीपी माझा हेडलाईन्स 7 AM | 15 August 2024
देशभरात ७८ व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह... थोड्याच वेळात लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदी तिंरगा फडकवून देशाला संबोधित करणार
मुंबईसह ठाण्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन... ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
अंतरवाली सराटीत संभाजीराजे आणि जरांगेंची बैठक, विधानसभेसंदर्भात दोघांमध्ये चर्चा, जरांगेंना पूर्ण सहकार्य करण्याची संभाजीराजेंची भूमिका
लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यास सुरुवात, अनेक महिलांच्या खात्यात योजनेचे दोन हफ्ते जमा, रक्षाबंधनच्या आधीच ३००० रुपये खात्यात
गणेशोत्सव मंडळांना सरकारकडून सवलतींचा वर्षाव...फक्त शंभर रूपये भाडं आकारलं जाणार, मूर्तीकारांना साहित्य सबसिडी योजनेचा विचार, मुंबईत लोकल रात्रभर सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न...
म्हाडाची बनावट वेबसाईट अखेर लॉक,....सायबर पोलिसांची कारवाई... सायबर सेलकडून पुढील तपास सुरू असून नागरिकांनी सावधिरी बाळगण्याचं आव्हान
पैलवान विनेश फोगटची निराशा...रौप्य पदक मिळणार नाही, आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादानं याचिका फेटाळली... ॉ