ABP Majha Headlines :09.00 AM : 23 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
शालेय अभ्यासक्रमातील इंग्रजी भाषेचं बंधन शिथिल होण्याची शक्यता, अकरावी आणि बारवीत इंग्रजीची सक्ती नसेल, राज्याच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्यातून बाब समोर
लोकसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या विशाल पाटलांची सांगलीतील काँग्रेसच्या कार्यक्रमात हजेरी, पाटलांच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण
गजानन कीर्तिकरांच्या भूमिकेनंतर शिवसेनेत नाराजी, कीर्तिकरांवर पक्षांतर्गत कारवाईची शक्यता, शिवसेनेच्या शिस्तभंग कमिटीकडे तक्रार अर्ज दाखल
उजनी धरण क्षेत्रात बुडालेल्या ६ जणांपैकी पाच मृतदेह सापडले, एकाचा शोध अद्याप सुरुच
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द, ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी, सज्ञान असल्याचा निर्णय पोलीस तपासानंतर ठरवणार
अल्पवयीन मुलांना मद्य दिल्यास बार मालकांना ५० हजारांचा दंड, टीकेची झोड उठल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला अखेर जाग;
राज्यभरात भीषण पाणीटंचाई, अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा, पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, तर नगरमध्ये दूध उत्पादनावरही परिणाम
करवीरचे काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांचं निधन, बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्याने डोक्याला दुखापत, उपचारादरम्यान वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विराट कोहलीची बंगळुरु आयपीएल स्पर्धेतून बाहेर, एलिमिनेटर मॅचमध्ये राजस्थानकडून आरसीबी पराभूत, हेटमायर-परागच्या बॅटिंगमुळे राजस्थान दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दाखल.
रायगडमधील १०३ गावांना दरडीचा धोका, अतिधोकादायक गावांना पावसाळ्यापूर्वी सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याचे निर्देश तर दरडग्रस्त गावांसाठी तातडीने उपाययोजना राबवणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती