ABP Majha Headlines : 06 PM : 29 June : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा...मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवारांचं स्पष्टीकरण...
अधिवेशनात नीटच्या मुद्द्यावरून अधिवेशनात विरोधक आक्रमक...नीट पेपर फुटी प्रकरणी राज्यात स्वतंत्र कायदा करण्याची मागणी...तर अर्थसंकल्पातील योजनांवरून सरकारविरोधात घोषणाबाजी
राज्यात 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरु करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय. तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी नियमावली ठरवू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन.
विधानसभेलाही लोकसभेसारखेच निकाल लागतील, शरद पवारांना विश्वास, काँग्रेसमुक्तीची घोषणा देणाऱ्या मोदींनी भाजपच्या जागा किती घटल्या बघावं असा सल्ला
वायकरांचा मेहुणेा मंगेश पंडीलकरकडं होतं अपक्ष उमेदवाराच्या पोलिंग एजंटचं आयडी कार्ड, पंडीलकरनं दोन उमेदवारांचं ओळखपत्र वापरल्याचा शाह यांचा आरोप....
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंची पक्षातून हकालपट्टी.. कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी तीन दिवस पोलीस कोठडी
नीट पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढली...लातूरसोबत बीडचंही कनेक्शन... आरोपींकडे सापडलेल्या १४ एडमिट कार्ड पैकी ७ कार्ड बीडच्या विद्यार्थ्यांचे असल्याचं समोर
गंगानदीची पाणीपातळी वाढल्याने उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये पूरस्थिती.. अनेकांची घरं पाण्यात, तर गाड्याही गेल्या वाहून
अरविंद केजरीवालांना पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल अटकेत..
पुण्यातील वानवडीत टँकर चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून अपघात, टँकरच्या धडकेत
काही मुलं आणि महिला जखमी,तर मुलाच्या वडिलांना अटक.
संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान, मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलं माऊलींच्या पादुकांचं दर्शन.. तर तुकोबांच्या पालखीचा आज आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पहिला मुक्काम
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांत आज अंतिम सामना,भारतीय वेळेनुसार आज रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार.