ABP Majha Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 6.30 AM | 05 Jan 2025 | ABP Majha
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना चौदा दिवसांची सीआयडी कोठडी...मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेच्या पुण्यातून आवळल्या होत्या मुसक्या...
सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्ध सकल मराठा समाजाचा पुण्यात जन आक्रोश मोर्चा, मोर्चाला पृथ्वीराज चव्हाण, मनोज जरांगे, सुरेश धस यांच्यासह रोहित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती.
लाडकी बहीण योजनेत लावलेल्या निकषावरून विरोधकाकडून टीकेची झोड...योजनेवर श्वेतपत्रिका काढण्याची सुप्रिया सुळेंची मागणी...तर निवडणुका समोर ठेवून ही योजना सुरू केली, बच्चू कडूंची टीका...
कोकणातल्या निकालावरून मातोश्रीवर खडाजंगी...राजन साळवींनी विनायक राऊतांवर फोडलं पराभवाचं खापर...राऊतांच्या पराभवाला तुम्ही जबादार नाही का? ठाकरेंचा उलटा सवाल...
जिल्ह्यांना अजूनही पालकमंत्री न मिळाल्यानं विरोधकांचे ताशेरे... जिल्ह्याचं बजेट बघून पालकमंत्री व्हायचं आहे का?, रोहित पवारांचा सवाल...तर सोमवारी किंवा मंगळवारी निर्णय,शिरसाटांची माहिती..
काँग्रेसकडून मुखमंत्री देवेंद्र फडणवीसांसह इतर आठ विधानसभा मतदारसंघातल्या निकालाला आव्हान...प्रफुल्ल गुडधे, यशोमती ठाकूर, गिरीश पांडव, राजेंद्र शिंगणेंनी दाखल केल्या नागपूर खंडपीठात याचिका...




















