(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP C Voter survey : एबीपी-सी व्होटर सर्वे Ravi Kiran Deshmukh यांची प्रतिक्रिया ABP Majha
ABP C Voter survey : नुकत्याच पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर आता लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha 2024) पडघम वाजू लागले आहे. भाजपच्या (BJP) नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वातील 'इंडिया' (I.N.D.I.A.) मध्ये सरळ लढत असणार आहे. काही राज्यांमध्ये तिंरगी लढती होण्याच्या शक्यता आहेत. वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल, एमआयएम, तेलगू देसम पक्ष, भारत राष्ट्र समिती आदी पक्ष सध्या कोणत्याही आघाडीत नाहीत.
हिंदी भाषिक राज्यात मिळालेल्या यशानंतर भाजपचा आत्मविश्वास सध्या वाढलेला आहे. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीतही होईल असा विश्वास भाजपला आहे. उत्तर भारतात दणदणीत विजय मिळेल असा विश्वास भाजपला आहे. तर, दुसरीकडे दक्षिण भारतात अधिकाधिक जागा जिंकण्याचे आवाहन भाजपसमोर आहे. या दरम्यानच एबीपी न्यूजसाठी सी व्होटरने दक्षिण भारतात लोकसभेच्या जागांसाठी ओपिनियन पोल घेतला आहे. या निवडणूकपूर्व सर्वेत भाजपला झटका बसणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आला आहे.