Unemployment Rate in India CMIE : भारतात बेरोजगारीच्या आकड्यानं गाठला 16 महिन्यातील उच्चांक
Unemployment Rate in India CMIE : भारतात बेरोजगारीच्या आकड्यानं गाठला 16 महिन्यातील उच्चांक
Center For Monitoring Indian Economy ने नुकताच देशातील बेरोजगारीबद्दलचा रिपोर्ट जाहीर केलाय. या रिपोर्टमधून देशातील बेरोगारीचं वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण, CMIE चा हा रिपोर्ट नेमकं काय सांगतोय हे समजून घेऊ. भारतासमोर सध्या काही प्रमुख आव्हानं आहेत, यापैकी एक आव्हान म्हणजे बेरोजगारी. त्यातच आता बेरोजगारीबद्दल आणखी एक चिंता वाढवणारा रिपोर्ट समोर आलाय. CMIE या संस्थेच्या रिपोर्टनुसार देशात बेरोजगारीच्या आकड्यात मोठी वाढ झालीय. CMIE अर्थात सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी ही संस्था अर्थ क्षेत्रातील वेगवेगळ्या गोष्टींचा डेटा कलेक्ट करणे, त्याचं विश्लेषण करण्याचं काम करते. महत्वाचं म्हणजे ही संस्था सरकार, शिक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रांना सेवा देत असते.
CMIE ने सध्या देशातील बेरोजगारीबद्दल एक रिपोर्ट जाहीर केलाय, या रिपोर्टनुसार डिसेंबर 2022 मध्ये बेरोजगारीच्या आकड्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसतंय... डिसेंबर 2022 मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर 8.30 वर पोहोचलाय. मागच्या 16 महिन्यांच्या तुलनेत हा सर्वात जास्त आहे.
बेरोजगारीच्या या दराचं ग्रामीण आणि शहरी आणि प्रादेशिक पद्धतीनं विश्लेषण करण्यात आलंय. त्यानुसार ग्रामीण भागांपेक्षा जास्त बेरोजगारी ही शहरी भागात आहे.