PM Modi Warns Pakistan on Nuclear Weapons : अण्वस्त्रांवरून ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही : मोदी
नवी दिल्ली : यापुढे दहशतवाद आणि व्यापार एकसोबत चालणार नाही, पाणी आणि रक्त एकासोबत वाहणार नाही. यापुढे पाकिस्तानसोबत चर्चा झाली तर फक्त पाकव्याप्त काश्मीरवर आणि दहशतवादावरच होणार असल्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. यापुढे पाकिस्तानच्या अणवस्त्रांच्या धमकीला घाबरणार नाही, त्याच्यावर जोरदार कारवाई होणार असल्याचा इशाराही नरेंद्र मोदी यांनी दिला. ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित करण्यात आलं आहे, गरज पडल्यास ते पुन्हा सुरू करणार असं मोदी म्हणाले.
आम्ही भारतीय लष्कराला पूर्ण मोकळीक दिली आणि त्यानंतर लष्कराने कारवाई करत पाकिस्तानचे दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. भारताच्या जबरदस्त हल्ल्यानंतर पाकिस्तान जगभर मदतीची याचना करत होता. त्यानंतर 10 मे रोजी दुपारी पाकिस्तानच्या डीजीएमओचा शस्त्रसंधीसाठी फोन आला. तोपर्यंत भारतीय लष्कराने त्याचं काम पूर्ण केलं होतं अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली.






















