(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagaland NCP BJP : नागालँडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपची युती होणार का?
नागालँडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपची युती होणार का? अशी चर्चा रंगलीए.. भाजपसोबत जाण्यावरून राष्ट्रवादीच्या स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं कळतंय... नागालँडमध्ये राष्ट्रवादी सात जागांसह तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे.. नागालँडमध्ये राष्ट्रवादीने सत्तेत जायचा निर्णय घेतल्यास सर्वपक्षीय सरकार बनेल... इतर छोट्या छोट्या पक्षांनीही एनडीपीपी भाजप प्रणित सरकारला पाठिंबा जाहीर केलाय... राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा कल सत्तेत सहभागी होण्याकडे आहे....मात्र अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती नागालँड प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी दिलीए... आज सकाळी याबाबत शरद पवारांना भेटल्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल.... नागालँडमध्ये एन डी पी आणि भाजप समर्थित आघाडीला स्पष्ट बहुमत आहे... त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी त्यांना कोणाचीही गरज नाही.. पण तरी राज्याचा पूर्व इतिहास बघता सगळेच पक्ष सत्तेत सहभागी व्होतायत,.,,