एक्स्प्लोर

Kashi Vishwanath Corridor : काशी विश्वनाथ कॉरिडोरचं लोकार्पण,पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत कार्यक्रम

Kashi Vishwanath Corridor :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडोरचं आज लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यासाठी वाराणसी नगरी सजली आहे. मोदींच्या स्वागतासाठी काशी विश्वनाथ मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय. काशी विश्वनाथ कॉरिडोर लोकार्पणचा हा सोहळा जवळपास तीन तास चालणार आहे. या सोहळ्या दरम्यान आतषबाजी, लेजर शो आणि दीपोत्सवही पाहायला मिळणार आहे. 8 मार्च 2019 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते काशी विश्वननाथ कॉरिडोरचं भूमीपूजन करण्यात आलं होतं. आज पंतप्रधान मोदी या कार्यक्रमानंतर 2500 मजुरांसोबत भोजन करणार असल्याची देखील माहिती आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात आधी काशी विश्वनाथाच्या मंदिरात जाऊन पूजा-अर्चना करणार आहेत. काशी विश्वनाथ धामच्या पहिल्या टप्प्यातील इमारतींचे उद्घाटन करतील. सुमारे 339 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. काशी विश्वनाथ मंदिराला गंगा नदीशी जोडणारे सगळे मार्ग सहजतेने जोडण्याचे काम या प्रकल्पाअंतर्गत करण्यात आले आहे. हा प्रकल्प आता सुमारे 5 लाख चौरस फूट एवढ्या मोठ्या क्षेत्रावर पसरला आहे, तर पूर्वीची जागा फक्त 3000 चौरस फूट इतकी मर्यादित होती. कोविड महामारी असूनही, प्रकल्पाचे काम नियोजित वेळापत्रकानुसार पूर्ण झाले आहे. याची सुरुवात 8 मार्च 2019 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन करुन झाली होती.  

या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर पंतप्रधान स्वतः देखरेख ठेवून होते, या प्रकल्पाविषयी, नियमितपणे माहिती, आढावा घेणे आणि देखरेखीचे काम त्यांनी वेळोवेळी केले. तसेच, कामाचा दर्जा वाढवण्यासाठी, प्रकल्पातील सुविधा सर्व भाविकांसाठी-अगदी दिव्यांगांसाठीही अधिकाधिक सहज साध्य होण्यासाठीच्या सूचना आणि सल्लेही त्यांनी वेळोवेळी दिले. या प्रकल्पाची संरचना अशा तऱ्हेची करण्यात आली आहे, जेणेकरुन, वृद्ध लोक आणि दिव्यांगांना इथे जाणे सुलभ होईल. त्यात रेंप, एस्केलेटर्स आणि इतर आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात, 23 इमारतींचे उद्घाटन केले जाणार आहे. या अंतर्गत, काशी विश्वनाथ मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांना विविध सुविधा पुरवल्या जाणार आहेत. यात, यात्री सुविधा केंद्र, पर्यटक सुविधा केंद्र, वैदीक केंद्र, मुमुक्षू भवन, भोगशाला, शहर वस्तूसंग्रहालय, पर्यटक गॅलरी, फूड कोर्ट अशा सुविधांचा समावेश आहे.

भारत व्हिडीओ

PM Modi Speech : काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर मोदींचा घणाघात
PM Modi Speech : काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर मोदींचा घणाघात

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray Dussehra Rally : भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray Dasara Melava : ... तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचं वचन
... तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचं वचन
Gulabrao Patil : कव्वा कबुतर नही बन सकता, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
कव्वा कबुतर नही बन सकता, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
Uddhav Thackeray: तुला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी निवडलंय, तुला योग्य वाटेल तेच कर; रतन टाटांचा ठाकरेंना मोलाचा सल्ला
तुला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी निवडलंय, तुला योग्य वाटेल तेच कर; रतन टाटांचा ठाकरेंना मोलाचा सल्ला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde on MVA Dasara Melava : होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडीNitin Banugade Patil Dasara Melava Speech : बानगुडे पाटील गरजले-बरसले,मेळाव्यातील पहिलंच भाषण स्फोटकSuraj Chavan Meet Ajit Pawar : दादा पाणी पिता पिता थांबले, सूरजच्या एका एका वाक्यावर पोट धरुन हसलेAnil Desai On Aaditya Thackeray Speech : दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे पहिल्यांदा भाषण करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Dussehra Rally : भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray Dasara Melava : ... तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचं वचन
... तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचं वचन
Gulabrao Patil : कव्वा कबुतर नही बन सकता, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
कव्वा कबुतर नही बन सकता, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
Uddhav Thackeray: तुला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी निवडलंय, तुला योग्य वाटेल तेच कर; रतन टाटांचा ठाकरेंना मोलाचा सल्ला
तुला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी निवडलंय, तुला योग्य वाटेल तेच कर; रतन टाटांचा ठाकरेंना मोलाचा सल्ला
Sanjay Raut Dasara Melava 2 महिन्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री या व्यासपीठावर; संजय राऊतांचा CM पदावर दावा, मेळाव्यातून शिंदेंवर जोरदार हल्ला
2 महिन्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री या व्यासपीठावर; संजय राऊतांचा CM पदावर दावा, मेळाव्यातून शिंदेंवर जोरदार हल्ला
Eknath Shinde Dasara Melava : टीका करणाऱ्यांना एकनाथ शिंदे पुरून उरला, ठासून दोन वर्ष पूर्ण केली, मला हलक्यात घेऊ नका : एकनाथ शिंदे
टीका करणाऱ्यांना एकनाथ शिंदे पुरून उरला, ठासून दोन वर्ष पूर्ण केली, मला हलक्यात घेऊ नका : एकनाथ शिंदे
Aaditya Thackeray Dasara Melava:  ...आणि म्हणोन, आणि म्हणोन;दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची मिमिक्री करत उडवली खिल्ली
...आणि म्हणोन, आणि म्हणोन;दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची मिमिक्री करत उडवली खिल्ली
डायमंडच... रतन टाटांचं 1100 हिऱ्यांनी बनवलं हिरेजडीत पोट्रेट; सूरतच्या व्यापाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
डायमंडच... रतन टाटांचं 1100 हिऱ्यांनी बनवलं हिरेजडीत पोट्रेट; सूरतच्या व्यापाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
Embed widget