Uddhav Thackeray Dussehra Rally : भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
महाराष्ट्रात यांना कोणी विचारत नव्हतं तेव्हा आम्ही घेऊन फिरवलं. मात्र, याच भाजपला आता राजकारणातून खांदा देण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला.
Uddhav Thackeray Dussehra Rally : या देशामध्ये कोणताही पक्ष शिल्लक राहता कामा नये, असं भाजपचं धोरण आहे. तुम्ही आम्हाला संपवायला निघाला आहात. महाराष्ट्रात यांना कोणी विचारत नव्हतं तेव्हा आम्ही घेऊन फिरवलं. मात्र, याच भाजपला आता राजकारणातून खांदा देण्याची वेळ आली आहे, ही वृत्ती संपवावी लागेल, यांचा शिरच्छेदच करावा लागेल, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला.
आम्हाला भाजपला राजकारणात खांदा द्यायचा आहे
शिवतीर्थावरून दसरा मेळाव्याला संबोधित करताना भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मी आणि मीच दुसरं कोणी नाही असं चालणार नाही. तुम्ही आम्हाला संपवायला निघाला आहात. आम्हाला भाजपला राजकारणात खांदा द्यायचा आहे. जशी परिस्थिती महाभारतामध्ये अर्जुनची झाली होती मी कोणासोबत लढू, हे माझेच आहेत. कृष्णाने सांगितलं आपला बघू नको. आपल्यासोबत राहतो तो मित्र, आपल्या विरोधात जातो तो शत्रू. कसलाही विचार करू नको आणि लढ. तशी ही लोकं आपल्यावर चालून येत आहेत. त्यांचा शिरच्छेद करावाच लागेल.
जो शिवाजी महाराज मंदिराला विरोध करेल त्याला महाराष्ट्र माफ करणार नाही
ठाकरे म्हणाले की, भाजप केवळ मतांसाठी शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला आणि तो पाडला. आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार आहे. ते आपलं दैवत आहे. प्रत्येक राज्यात शिवाजी महाराज यांचा मंदिर उभारल गेलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि राज्याभिषेक दिवशी पुतळे साफ करायचा असा प्रेम नको. शिवाजी महाराज हे मतं मिळणारे यंत्र नाही, ते ईव्हीएम मशीन नाही. जो शिवाजी महाराज मंदिराला विरोध करेल त्याला महाराष्ट्र माफ करणार नाही.
गद्दारला नेता मानून आमच्याशी, लढावं लागतंय यातच तुमचा पराभव
त्यांनी सांगितले की, मोहन भागवत यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, पण तुम्ही हिंदूनो एकत्र या सांगत आहात, पण तुमचे विश्वगुरु हिंदूचे रक्षण करू शकत नाही? तीनवेळा सरकार आले. तुम्हाला गद्दारी दिसली नाही, माझं सरकार खेचलं.100 वर्ष आरएसएस झालं त्याचे चिंतन शिबीर घ्या. आता तुमचा भाजप नाही, हा हायब्रीड भाजप झाला आहे. इतर पक्षातील नेते भाजपच्या गर्भात बसले आहेत. भारतीय जनता पक्ष जनतेचा राहिला नाही. गद्दारला नेता मानून आमच्याशी लढावं लागतंय यातच तुमचा पराभव आहे
इतर महत्वाच्या बातम्या