Suraj Chavan Meet Ajit Pawar : दादा पाणी पिता पिता थांबले, सूरजच्या एका एका वाक्यावर पोट धरुन हसले
Suraj Chavan and Ajit Pawar : बिग बॉसच्या विजयानंतर बारामतीच्या सूरज चव्हाणची (Suraj Chavan) भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वत: सूरजला फोन केला होता. पण त्यावेळी सूरजला अजित पवारांना भेटणं शक्य झालं नाही. पण अखेरीस बिग बॉसची ट्रॉफी घेऊन सूरज चव्हाण अजित पवारांच्या भेटीला गेलाय. त्याचप्रमाणे अजित पवारांनी यावेळी सूरज चव्हाण घराचीही भेट दिली आहे. गावात नवीन जागा घेऊन त्याला घर बांधून द्या अशा सूचना अजित पवारांनी फोनवरुन दिल्या आहेत.
यावेळी अजित पवारांनी सूरजच्या घराच्यांचीही चौकशी केली. तसेच सूरजने अजितदादांना त्याच्या वडिलांच्या जाण्याचा प्रसंग सांगितला. अजित पवारांनी सूरजच्या बहिणींविषयीही चौकशी केली होती. तसेच सूरजचा बिग बॉसमध्ये प्रवेश कसा झाला याविषयीही अजित दादांनी जाणून घेतलं.
अजितदादांकडून सूरजला घर गिफ्ट
त्याचं घर लहान आहे... त्याला गावात घर बांधून द्या अशा सूचना यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. बिग बॉसच्या घरातच सूरजच्या घराची बरीच चर्चा झाली. इतकच नव्हे बिग बॉसमधील स्पर्धक अंकिता वालावलकर हिनेही त्याला घर देण्याचं सांगितलं होतं. पण आता थेट उपमुख्यमंत्र्यांची सूरजला घर गिफ्ट केलं आहे.
रिलचे पैसे मिळतात का?
सूरज हा त्याच्या रिलमुळे जास्त फेमस झाला. तसेच बिग बॉसमध्येही त्याची एन्ट्री ही रिलमुळेच झाली. त्यावर अजित पवारांनी त्याला विचारलं की, बिग बॉस मधे कसं बोलवलं? तेव्हा सूरजने सांगितलं की, रिल बघून मला बिग बॉसमध्ये बोलावलं. मला बिग बॉसचा कॉल आला तेव्हा खरं वाटत नव्हता. पण मग खरं वाटलं आणि गेलो. त्यानंतर रिलचे पैसे मिळतात का? त्यावर सूरजने म्हटलं की, नाही रिलचे पैसे मिळत नाहीत, आता पिक्चर येतोय माझा...