Corona : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे दोन राज्यात मिनी लॉकडाऊन, महाराष्ट्रातही कठोर निर्बंध?
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनची स्थिती निर्माण झालीय. नववर्षाच्या सुरुवातीलाच दोन राज्यात मिनी लॉकडाऊन लावण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातही आणखी कठोर निर्बंध लागणार का याकडं लक्ष लागलंय. दिल्लीपाठोपाठ हरियाणा आणि पश्चिम बंगालमध्ये शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना महाराष्ट्रातील शाळा-कॉलेजबाबत काय निर्णय घेतला जाणार याकडं लक्ष लागलंय. मुंबईसह राज्यातील कॉलेजबाबत दोन दिवसात महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याचे संकेत उच्च-तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिलेत. ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात रात्री कर्फ्यूसह इतर अनेक निर्बंधांची घोषणा केलीय. मात्र आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने हे निर्बंध आणखी कठोर होणार का याकडे लक्ष लागलंय.