Who Is Pradeep Kurulkar : पाकिस्तानला गोपनीय दिल्याचे आरोप डॉ.प्रदीप कुरुलकर नेमके आहेत कोण ?
सध्या देशातल्या आणि आपल्या राज्यातल्याही अनेक विरोधी पक्षनेत्यांकडून, विरोधातल्या मंडळींकडून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर पक्षांकडून डॉ. प्रदीप कुरूलकर यांच्याविरोधात आंदोलनं होतायत. देशद्रोही असा ठपका आता त्यांच्यावर लागलाय. पाकिस्तानला देशाच्या संरक्षण क्षेत्रातील माहिती देण्याचा आरोप असलेले डीआरडीओचे संचालक यांची एटीएस कोठडी संपतेय. पण कुरुलकर यानी नक्की कोणती माहिती दिली आणि नक्की कोणता तपास करायचा आहे याची माहिती एटीएसकडून न्यायालयात दिली जातेय. पण प्रचंड कतृत्ववान आणि देशाच्या संरक्षण सज्जतेसाठी झटणारा अशा अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा ठपका लागतो कसा आणि हे डॉ. प्रदीप कुरूलकर नेमके आहेत कोण पाहुयात या व्हिडीओच्या माध्यमातून


















