एक्स्प्लोर
Chandrapur : चंद्रपुरातील अनेक भागांना पुराचा वेढा, पाऊस नसतानाही कसा आला पूर? ABP Majha
चंद्रपुरात वर्धा नदीनं इशारा पातळी ओलांडलीये. यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे निम्न वर्धा आणि बेंबाळ धरणातून पाणी सोडल्याने पैनगंगा आणि वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झालीये. या पुरामुळे पैनगंगा नदीचं पाणी वाढल्याने कोरपना तालुक्यातील अंतरगाव गावात पुराचं पाणी शिरलंय. त्यामुळे वनसडी-अंतरगाव आणि कोडशी-पिपरी मार्ग बंद करण्यात आलाय. सोबतच बल्लारपूर-राजुरा मार्गही बंद करण्यात आलाय. पैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























