Chandrapur Ashram Schedule : आश्रम शाळेत दोन जेवणामध्ये तब्बल 18 तासांचं अंतर, पालक संभ्रमात
Chandrapur Ashram Schedule : आश्रम शाळेत दोन जेवणामध्ये तब्बल 18 तासांचं अंतर, पालक संभ्रमात
आदिवासी विकास विभागाने राज्यातील आश्रम शाळांसाठी काढलेल्या परिपत्रकामुळे मोठा गोंधळ झालाय. या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांची दिनचर्या सकाळी 6 वाजता सुरू होऊन रात्री 9:15 पर्यंत चालणार आहे. त्यात मुलांच्या जेवणाची वेळ दुपारी 12:30 आणि संध्याकाळी 6:30 अशी आहे. म्हणजेच संध्याकाळी 6:30 वाजता जेवलेल्या विद्यार्थ्यांना दुसरं जेवण दुपारी दुपारी 12:30 वाजता म्हणजे तब्बल १८ तासांनी मिळणार आहे. हे वैद्यकीय दृष्ट्या किती योग्य आहे, शिवाय प्राथमिक वर्गाची मुलं सकाळी ६ ते रात्री साडेनऊपर्यंत कसे कार्यरत राहतील, हाच खरा प्रश्न आहे. सोबतच शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनाही किमान 15 तास काम करावं लागणार आहे. याबाबत नागपूर विभागाचे शिक्षक आमदार यांनी सुधाकर अडबाले यांनी विरोध केलाय.