Beed : उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि भगवान गडाचे महंत Namdev Shastri एकाच मंचावर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री आज एकाच व्यासपीठावर येणार आहेत. भाजप आमदार श्रीकांत भारती यांच्या तर्पण फाऊंडेशनच्या कार्यक्रमात फडणवीस आणि नामदेव शास्त्री एकाच व्यासपीठावर येणारेत. गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडावर अनेक राजकीय समीकरणं उदयाला आणली. पंकजा मुंडे गडाचं यांनाही गडाचे व्यासपीठ मिळालं होतंं पण मठाधिपती महंत नामदेवशास्त्री यांनी पाच वर्षांपूर्वी गडावर राजकीय भाषण बंदी केलानंतर पंकजा मुंडे यांनी स्वतंत्र भगवानगड भक्तिगड उभारला आहे. तेव्हापासून पंकजा या नामदेव शास्त्री हे प्रमुख असलेल्या गडापासून दूर आहेत. त्यातच आता देवेंद्र फडणवीस आणि नामदेव शास्त्री एकाच व्यासपीठावर येणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.























