Balwant Wankhade : माझ्या समोर कोणीच प्रतिस्पर्धी नाही; विजय निश्चित होणार - बळवंत वानखडे
Balwant Wankhade : माझ्या समोर कोणीच प्रतिस्पर्धी नाही; विजय निश्चित होणार - बळवंत वानखडे दुसऱ्या टप्प्याचं मतदान 26 एप्रिल रोजी होणार आहे. ज्यामध्ये अमरावती लोकसभेचं ही मतदान होणार आहे.. सध्या सगळ्याच पक्षाचे उमेदवार गल्लीमध्ये जाऊन प्रचार करतांना दिसताय.. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या सुद्धा सकाळी 8 वाजेपासून गावा-गावात जाऊन प्रचार रॅली घेताय.. पदयात्रा काढलाय. माझ्या समोर कोणीच प्रतिस्पर्धी नसून माझा विजय हा निश्चित होणार असल्याचा दावा एबीपी माझाशी बोलतांना बळवंत वानखडे यांनी केला आहे.. आजपासून अमरावती जिल्ह्यात मोठ-मोठ्या नेत्यांच्या सभेला सुरुवात झाली असून प्रचारात कोण आघाडी मारतो हे 26 तारखेला होणाऱ्या मतदान नंतरच कळेल...


















