एक्स्प्लोर

उद्या निवडणुकांसाठी तयार! शिंंदेंशी दुरावा आल्याची चर्चा ते ठाकरे बंधू एकत्र ते मराठा आंदोलनाला फंडिंग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फडणवीस म्हणाले की बीएमसी निवडणुका थांबवल्या नाहीत, तर सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणावर स्थगिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की त्यांच्या सरकारने या विषयावर सर्वोच्च न्यायालयाचे मन वळवले होते.

Devendra Fadnavis: पक्ष फोडल्याचा आरोप करणारे जर म्हणत असतील की त्यांनी कुटुंब (ठाकरे बंधू) एकत्र केले, तर श्रेय घेण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी म्हटले आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis interview 2025) यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. मराठा आरक्षण, फंडिंग, ठाकरे बंधू, एकनाथ शिंदे, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी भाष्य केलं. गेल्या काही दिवसांपासून उलटसूलट चर्चा होत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde relations Devendra Fadnavis) यांच्यासोबत गैरसमज दूर करत नाते दृढ असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. मुंबई मनपासह स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवर विचारणा करताच त्यांनी उद्या निवडणुका लागल्या तरी तयार असल्याचे निवडणूक रोखल्याचा आरोप फेटाळून लावल्या. 

 

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण

मराठा आरक्षणावर बोलताना फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण हीच सरकारची भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोस्टरवरील वादाबाबत ते म्हणाले की शिवाजी महाराज हे सर्व समाजाचे होते आणि त्यांच्या समावेशकतेचा संदेशच पोस्टरमधून दिला गेला. बीएमसी निवडणुका अडविल्याचा आरोप फेटाळून फडणवीस यांनी सांगितले की निवडणुका सर्वोच्च न्यायालयामुळे थांबल्या असून, सरकार त्यासाठी पूर्णपणे तयार आहे.  

राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी राज आणि उद्धव ठाकरे (Raj Thackeray Uddhav Thackeray meeting) यांच्या एकत्र येण्यावर ते म्हणाले की लोक त्यांच्यावर पक्ष आणि कुटुंबे तोडल्याचा आरोप करतात, परंतु जर कोणी म्हटले की त्यांनी कुटुंब एकत्र केले आहे, तर निश्चितच श्रेय घेईन. फडणवीस म्हणाले की याचा खूप आनंद होईल आणि दोन्ही भाऊ एकत्र राहून निवडणूक लढवण्यास त्यांना कोणतीही अडचण नाही. फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी असलेले त्यांचे संबंध नेहमीच चांगले असल्याचे सांगितले. शिंदे मंत्रिमंडळाच्या बैठकांना उपस्थित राहत नव्हते किंवा त्यांच्याबद्दल तक्रार करण्यासाठी दिल्लीला जात होते अशा बातम्या त्यांनी फेटाळून लावल्या. त्यांनी स्पष्ट केले की शिंदे फक्त एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत आणि त्याचे कारण ठाण्यातील मुसळधार पाऊस होता. 

 

मराठा आरक्षणावर फडणवीस म्हणाले..

मराठा आरक्षणाबाबत फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, ओबीसी आरक्षणाशी तडजोड न करता मराठा आरक्षण दिलं आहे. लावण्यात आलेल्या फलकचा अर्थ स्पष्ट करताना ते म्हणाले की, याचा अर्थ असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज केवळ मराठ्यांचेच नव्हते तर ओबीसींसह सर्व 18 पगड जातींचे होते. सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समुदायाच्या आरक्षणाला हानी पोहोचवली नाही, अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या समावेशकतेच्या दृष्टिकोनाचे समर्थन केले. त्यांनी पुढे म्हटले की या पोस्टरने केवळ जातीयवादी मानसिकता असलेल्यांना डिवचले.

बीएमसी निवडणुकीवर काय म्हणाले? 

फडणवीस म्हणाले की त्यांच्या सरकारने बीएमसी निवडणुका थांबवल्या नाहीत, तर सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणावर स्थगिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की त्यांच्या सरकारने या विषयावर सर्वोच्च न्यायालयाचे मन वळवले होते, त्यानंतर न्यायालयाने 30 जानेवारीपूर्वी सर्व निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. निवडणूक आयोग तीन टप्प्यात निवडणुका घेण्याची तयारी करत आहे. त्यांनी असेही सांगितले की त्यांचा पक्ष निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे आणि जर इच्छा असेल तर उद्या त्या घेऊ शकतो. या निवडणुका युतीने लढवल्या जातील.

तरी ते भारतात यशस्वी होणार नाही  

दरम्यान, भारताच्या तरुण लोकसंख्येचा (जनरल-झेड) उल्लेख करताना फडणवीस म्हणाले की पंतप्रधान मोदींनी हा लोकसंख्येचा लाभांश समजून घेतला आणि तरुणांसाठी संधी निर्माण केल्या. राहुल गांधी यांनी तरुणांना कितीही भडकवण्याचा किंवा त्यांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला तरी ते भारतात यशस्वी होणार नाही कारण तरुणांना एक दिशा मिळाली आहे, असे त्यांचे मत आहे.

मला अद्याप माहिती मिळालेली नाही

फडणवीस यांना मुलाखतीत मनोज जरांगे-पाटील यांच्या (Political funding Manoj Jrange Patil) आंदोलनाला फंडिंग कोण देतं आणि पोलिसांनी सादर केलेल्या यादीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या सदस्यांची नावे आहेत का? असे विचारले गेले तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांनी अशी कोणतीही यादी पाहिली नाही. त्यांनी कबूल केले की त्यांना आंदोलनाला निधी कोण देत आहे याबद्दल माहिती मिळते, परंतु ते त्यावर अधिक भाष्य करू इच्छित नव्हते. शिंदेंचा पक्ष जरांगे-पाटील यांना आर्थिक मदत करत आहेत का असे थेट विचारले असता त्यांनी उत्तर दिले, मला अद्याप अशी कोणतीही माहिती मिळालेली नाही. 

 

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray BMC Election 2026: नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाची 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर; 66 उमेदवारांची नावं, एका क्लिकवर
Maharashtra weather update: उत्तरेत पावसाच्या शक्यता, महाराष्ट्रात पुढील 24 तासांत हवामान बदलणार; वर्षाअखेरीस हवामान खात्याचा अंदाज काय?
उत्तरेत पावसाच्या शक्यता, महाराष्ट्रात पुढील 24 तासांत हवामान बदलणार; वर्षाअखेरीस हवामान खात्याचा अंदाज काय?
BJP-Shivsena UBT Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटापासून भाजपापर्यंत, सर्व उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटापासून भाजपापर्यंत, उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर
Pradeep Ramchandani Ulhasnagar Corporation : मोठी बातमी! उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
Gajanan Kale Navi Mumbai : नवी मुंबई मविआचं जागावाटप जवळपास निश्चित,मनसेच्या वाट्याला किती जागा?
Mahapalika Election Alliance : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी, कुणाची? कुणासोबत युती?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray BMC Election 2026: नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाची 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर; 66 उमेदवारांची नावं, एका क्लिकवर
Maharashtra weather update: उत्तरेत पावसाच्या शक्यता, महाराष्ट्रात पुढील 24 तासांत हवामान बदलणार; वर्षाअखेरीस हवामान खात्याचा अंदाज काय?
उत्तरेत पावसाच्या शक्यता, महाराष्ट्रात पुढील 24 तासांत हवामान बदलणार; वर्षाअखेरीस हवामान खात्याचा अंदाज काय?
BJP-Shivsena UBT Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटापासून भाजपापर्यंत, सर्व उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटापासून भाजपापर्यंत, उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
NCP Rakhi Jadhav: मोठी बातमी: शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का, राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार
NCP Rakhi Jadhav: मोठी बातमी: शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का, राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार
BMC Election 2026 Candidates list: उद्धव ठाकरेंचे मुंबईतील 28 उमेदवार ठरले, मातोश्रीवर एबी फॉर्म तयार, कोणाकोणाला संधी?
उद्धव ठाकरेंचे मुंबईतील 28 उमेदवार ठरले, मातोश्रीवर एबी फॉर्म तयार, कोणाकोणाला संधी?
Sharad Pawar & Ajit Pawar: मुंबईत काका-पुतणे वेगळाच डाव टाकणार? शरद पवार गटाकडून इच्छूक उमेदवारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला
मुंबईत काका-पुतणे वेगळाच डाव टाकणार? शरद पवार गटाकडून इच्छूक उमेदवारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला
Chandrapur: मुनगंटीवार अन् जोरगेवार यांच्यातील वाद शमता शमेना; नागपुरातील बैठकीत पुन्हा शाब्दिक चकमक; चंद्रपूरचा वाद आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या कोर्टात
मुनगंटीवार अन् जोरगेवार यांच्यातील वाद शमता शमेना; नागपुरातील बैठकीत पुन्हा शाब्दिक चकमक; चंद्रपूरचा वाद आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या कोर्टात
Embed widget