Pravin Kumar Death : महाभारत मालिकेत भीमाची भूमिका साकारणारे प्रवीण कुमार यांचं निधन
बीआर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत भीमाची भूमिका साकारणारे आणि माजी अॅथलिट प्रवीण कुमार यांचं निधन झालंय.. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.. गेल्या काही महिन्यांपासून पाठदुखीच्या आजारामुळे त्रस्त होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. बीआर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत त्यांनी साकारलेली भीमाची भूमिका सर्वाधिक गाजली. या भूमिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली.. दरम्यान अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी प्रवीण कुमार अॅथलिट होते.. त्यांनी आशियाई खेळामध्ये दोन सूवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावलं होतं.. यासोबतच 1968 आणि 1972 च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधत्वही केलं होतं.. त्यांच्या निधनामुळे सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे...






















