एक्स्प्लोर
Rajkummar Rao, Patralekhaa wedding : बॉलिवूडचं 'क्युट कपल' विवाहबंधनात अडकणार ABP Majha
बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा आज लग्नबंधनात अडकणार आहेत. चंदीगडमधील 'द ओबेरॉय सुखविलास स्पा रिसॉर्ट'मध्ये या दोघांचा आज विवाहसोहळा होणार आहे. काल त्यांचा साखरपुडा झाला. आणि याच सोहळ्यातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. ज्यामध्ये राजकुमार चक्क गुडघ्यावर बसून पत्रलेखाला प्रपोज करताना दिसतोय. पत्रलेखाच्या होकारानंतर दोघं मनमुराद डान्स करताना दिसतायेत. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दिलीये. मागील ३ दिवसांपासून या रिसॉर्टमध्ये लग्नाआधीचे सर्व विधी पार पाडले. त्याचे व्हीडिओ आणि फोटो आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतायेत.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















