Laal Singh Chaddha नंतर Arjun Kapoor बॉयकॉट मोहिम, आमिरच्या सिनेमावर अर्जुनची टीका : ABP Majha
आमिर खानला त्याचं एक वक्तव्य खूपच महाग पडलंय. त्याच्या त्या वक्तव्यामुळे बॉयकॉट लाल चड्ढा मोहीम सोशल मीडियावर सुरु झाली आणि चित्रपट फ्लॉप झाला. लाल सिंह चड्ढानंतर आता रणबीरचा ब्रह्मास्त्र, शाहरुख खानचा पठाण आणि ऋतिकच्या विक्रम वेधावरही बॉयकॉट मोहीम सुरु झालीय. आता तुम्ही म्हणाल या चारही चित्रपटांचा एकमेकांशी काय संबंध? तर संबंध आहे. करण जोहर नेहमीच कलाकारांच्या मुलांनाच संधी देतो, रणबीरनं हिंदू धर्माचा अपमान केलाय, शाहरुखनं दिवंगत सुशांत सिंहचा अपमान केला होता आणि ऋतिक रोशननं लाल सिंह चड्ढाची प्रशंसा करणं प्रेक्षकांना आवडलेलं नाही आणि त्यामुळंच त्यांच्या चित्रपटावर बॉयकॉट करण्याची मोहीम सुरु करण्यात आलीय. अर्जुन कपूरनं बॉयकॉट मोहीम चालवणाऱ्यांवर टीका केलीय. बॉयकॉट करणं हा एक ट्रेंड झालाय असं त्यानं म्हटलंय. एकूणच या बॉयकॉट मोहिमेमुळे बॉलिवूडचं नुकसान होतंय हे मात्र नक्की.