एक्स्प्लोर
Prakash Surve Son Crime : बंदुकीच्या धाकावर व्यावसायिकाचं अपहरण, प्रकाश सुर्वेंच्या मुलावर गुन्हा
मुंबईतील एका व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून त्याचं अपहरण केल्याप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेसह पंधराएक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेगावच्या वनराई पोलीसांनी या प्रकरणातला मुख्य आरोपी मनोज मिश्रासह विपुल सिंग आणि चेतन सिंग यांना मुंबई विमानतळावर आज अटक केली. विपुल सिंग आणि चेतन सिंग हे बिहारमधले कुविख्यात गुंड आहेत. गुन्हेगारीच्या विश्वात त्यांना अपहरणाच्या गुन्ह्यांसाठी ओळखलं जातं. या प्रकरणात आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे आणि आणखी काहीजण फरार आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्रीडा























