एक्स्प्लोर
Cruse Drugs Case : Sameer Wankhede यांच्यावर पाळत ठेवली जातेय? वानखेडेंच्या आरोपांनंतर राजकीय
Mumbai Drugs Case : मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. काही दिवसांपूर्वी कॉर्डेलिया क्रूझवरील छापेमारीमुळे चर्चेत आलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी महाराष्ट्र पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे सध्या खळबळ माजली आहे. वानखेडे बोलताना म्हणाले की, त्यांच्यावर बेकायदेशीर पद्धतीनं पाळत ठेवली जात आहे. तसेच मुंबई पोलीस दलातील काही पोलीस साध्या वेशात वानखेडेंवर पाळत ठेवत असल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओशिवरा पोलीस स्थानकातील 2 पोलीस समीर वानखेडेंच्या हालचालींवर पाळत ठेवून आहेत.
आणखी पाहा























